Tuesday, November 29, 2016

बापूंचे रामरक्षेवरील प्रवचन -31

प. पू. बापूंचे रामरक्षेवरील प्रवचन -31

हरिओम

आपल्याला एक छान सुंदर गोष्ट सांगायची आहे. कोजागिरी पौर्णिमेला मी

कोठींब्याला गेलो होतो, कशासाठी? काही जणांना माहीत असेल. मी चार साडेचार वर्षांपूर्वी मला जशी द्वारकामाई होती तशीच द्वारकामाई पाहीजे हा विचार मांडल्याबरोबर समीरदादा कामाला लागले

साईचरित्राचा साईलीलांचा अभ्यास केला.

द्वारकामाई जशी होती तशीच मांडायची होती. मंडळी कामाला लागली. त्यात मुंबईच्या दसपट मुसळधार पाऊस, त्यामधून जशीच्या तशी अगदी dicto, जिवंत द्वारकामाई तशीच्या तशी उभी राहीली. अगदी जिवंत द्वारकामाई! मुंबई पासून कर्जत फक्त दोन तासांच्या अंतरावर आहे. जवळ आहे.कृष्णाला भेटायला, पादुका बघायला परत परत जा.

द्वारकामाईत बसा. शांत बसा, गोंधळ घालू नका. साईचरित्र वाचा, बाबांच्या फोटोकडे बघा, कठड्याकडे बघा. कुठे फळी टांगली असेल, हाजी कसा आला असेल, वाघाने त्याची शेपटी कुठे आपटली असेल, साप चावल्यावर शामा कुठे बसला असेल? हेमाडपंत बाबांना कसे भेटले असतील. ती जिवंत वास्तू आहे, कृत्रिम नाही. कृष्णाच्या मंदिरासमोर गरुड स्तंभ आहे. मंत्रांची विशिष्ठ संख्या झाल्यानंतर पाप विमोचक बिंदू स्थापन झाला आहे, त्याचं दर्शन घेतल्यावर पापक्षालन होतं. स्तंभावर गरुड हनुमंत आहेत, एकाने विष्णुला वाहून घेतलंय, दुसयाने रामाला. गरूडावरी बैसुनी माझा कैवारी आला.

द्वारकामाई बनवताना मजा आली, ऐकताना छान वाटलं. दिव्याची काजळी दगडी भिंतीला लावली,effect येण्यासाठी ! किती काजळी जमा करावी लागली असेल, विचार करा! किती कष्ट करावे लागले असतील! शिळा पण तशीच ! कठडाही तसाच! धूनी पण तशीच! वास्तूच बदलत गेली, ह्यामधे त्यांचं प्रेम होतं, श्रद्धा होती. मुंबईपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर. जो राहण्यासाठी जाईल, ती व्यक्ती रात्रभर द्वारकामाईत बसू शकते ह्याची सोय केली आहे. फक्त वर जाऊ शकणार नाही, तिथे साखळी लावली जाईल. आत जाऊ शकणार नाही. बघा, भूतं रात्रीची येतात, कदाचित खूप मोठ्ठं भूत येईल, साधं सुधं नाही, महाभूत असेल, जाऊन बसा. किती सुंदर गोष्ट! 'कोण हतभागा माघारा जाई' ,मिळतंय तर घ्या राजांनो ! जा. तिथे बसा. काही मंडळी म्हणाली, बापू, द्वारका माई मधे दीपोत्सव साजरा करण्याची मुभा द्याल का?तर ठीक आहे,

प्रत्येकाला दिवे लावता येतील. जो गरूड स्तंभ आहे, त्याबरोबरच पापविमोचक स्तंभाला प्रदक्षिणा घालता येईल.

अजून एक सुंदर गोष्ट -

आठ दिवस मी नुसता फिरतोय रात्रंदिवस ! मंडळी वहया लिहीताहेत. मी गाडयांवरून पण फिरलो, नक्की काय चाललंय बघायला, तर प्रेमाने वह्या लिहीत

आहेत. लहान मुलं, म्हातारी माणसं! काही जणांच्या 2 / 2 वह्या झाल्यात. बरेच जण आसुसलेले आहेत. एक चौदा वर्षांचा मुलगा व अकरा वर्षांची मुलगी त्यांच्या बाबांना सांगतात, बाबा आमची वही तुमच्या आधी पूर्ण झाली. हा जो स्पीड आहे ना, तो असाच राहू देत, अधिकाधिक छान होवू देत. त्यात प्रचंड सामर्थ्य आहे. राम आहे, श्रीराम जयराम जय जय राम आहे, कृष्ण आहे, दत्तगुरु आहे.कोणीही श्रद्धावान उष्ण,स्निग्ध, रुक्ष गुणांचा असू देत, संत असू देत, की महापापी असू देत, प्रत्येकाला जी रचना हवी ती रचना त्यात आहे. कुठल्याही क्रमाने लिहू शकतो. शुद्धलेखन चुकलं तरी सगळेच्या सगळे फायदे मिळणारच आहेत. पानांची संख्या, जप संख्या ह्याची रचना अशी रचली आहे की त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे, प्रत्येक पानावर चित्र आहे, त्यामागे विशिष्ठ संकेत आहे. हनुमंताचे चित्र आहे, त्यामागे विशिष्ठ संकेत आहे. आपण त्यावर रामनाम लिहीलं की हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आमच्या कडून एक पान लिहीलं गेलं की सहा वेळा हनुमंताची परापूजा होते.परापूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे. आधी मूर्ती पूजा, मग मानस पूजा नंतर परापूजा. म्हणून रामनाम वही लिहीत राहा. हरिओम.

आता आपण बघत चाललो आहे -

मध्यं पातु खरध्वंसी -

मागच्या वेळेस खर राक्षसाचे दोन सेनापती बघितले, एक शंख करणारा व

दुसरा कापालकौशिक.

आज पुढचे जुळे भाऊ बघायचे आहेत धुम्रगंध व धुम्रवदन. धुम्र म्हणजे धूर. धुम्रगंध म्हणजे धुराचा वास तर धुम्रवदन म्हणजे धूरकटलेला चेहरा. हे दोन्ही खर राक्षसाचे सेनापती आहेत.

आपल्याला धूम्रगंध व धूम्रवदन कोण आहेत हे बघायचे आहे. जिकडे धूर आहे तिकडे अग्नी असलाच पाहीजे. पण जिकडे अग्नी असेल तिकडे धूर असेलच असे काही नाही. जेव्हा अग्नी पेटतो तेव्हा धूर कमी होतो. लहान मुलाच्या डोळ्यात काजळ घालतात, ते देवाच्या दिव्याच्या काजळीपासून तयार करतात, तो धूर चांगला. आम्हांला अग्नी हवा असतो पण धूर नको असतो. यज्ञाच्या वेळी ऐरणी मंथन पद्धतीने लाकडावर लाकूड घासून अग्नी तयार करतात. तो पवित्र अग्नी असतो.

आम्हाला अग्नी हवा असतो पण धूर नको असतो. अग्नीबरोबर येणारी अपरिहार्य गोष्ट म्हणजे धूर. धूर अग्नीमुळे उत्पन्न होतो. शास्त्रीयदृष्टया अग्नी ज्या पदार्थांना जाळतो, त्यातून धूर उत्पन्न होतो. अग्नी ज्याला जाळतो त्यापासून धूर उत्पन्न होतो, अग्नीतून धूर उत्पन्न होत नाही हे लक्षात घ्या राजांनो! म्हणजेच धूर चांगला की वाईट हे कशावर ठरेल, तर आपण काय जाळतो त्यावर! धूर जो आहे त्याचं चांगलं वाईटपण अग्नीवर ठरत नाही जे जळतं त्यावर ठरतं. आपल्या शरीरात अग्नी आहेच, त्यापासून निघणारा धूर म्हणजेच आमच्या प्राणाग्नीपासून निघणारा धूर म्हणजे "धूम्रवर्ण".

हे गणपतीचं, गणेशाचं, विनायकाचं नाव आहे.

जो वाईट धूर निघतो तो धूम्रगंध व धूम्र वदन. हे खर राक्षसाचे सेनापती आहेत. आमच्या प्राणशक्तीच्या चुकीच्या वापरामुळे हे निर्माण होतं. थंडीमधे हातावर हात घासतो, उष्णता निर्माण होते.

काही लोक म्हणतात Dr brandy मुळे उष्णता निर्माण होते. लहान बाळाला सुद्धा देतात. त्याला उलटी होते, मग म्हणतात कफ पडला असेल. अरे, ती दारू आहे, बाळाला सोसत नाही, acidity होते. वर्षानुवर्ष ही वाईट गोष्ट चालू आहे, मग मुलांना तीच सवय लागते.

व्यायामामुळे उष्णता निर्माण होते. उष्णता आहे म्हणजे गती आहे, हालचाल असेल तर उष्णता आहे, हालचाल नसेल तर उष्णता नाही. फ्रिज मधे हात ठेवू शकाल का? उष्णता आहे म्हणून हालचाल आहे. हालचाल नसेल तर वजन वाढतं.

कर्मेंद्रियांचा वापर अग्नीमुळेच होतो. कर्में द्रियांच्या कार्यासाठी उष्णता आवश्यक आहे.आमच्या कृतीने प्राणमय, मनोमय देहाला गती प्राप्त होते. आमच्या ज्ञानाग्नीला जेव्हा अनुचित कार्यासाठी वापरतो, तेव्हा अग्नी धुमसतो. अग्नी उत्पन्न होत नाही तर धूर निर्माण होतो. असा धूर म्हणजेच धूम्रगंध! आम्ही आमच्या कर्मेंद्रियांच्या केलेल्या अनुचित वापरामुळे मिळणारी शक्ती कमी होते. आम्ही आमची कर्मेंद्रिये चुकीच्या पद्धतीने वापरतो त्यामुळे अग्नी दिशा बदलतो, ताकद कमी मिळते, धूम्रगंध आमची ताकद हिरावून घेतो, आमची potency,competency हिरावून घेतो.

गंध हा पृथ्वी ह्या महाभूताचा गुणधर्म आहे. प्रत्येकाला गंध आवडतो. कर्मेंद्रियांच्या चुकीच्या वापरातून जो धूर निघतो तो म्हणजेच धूम्रगंध. प्रत्येक धूराला वास असतो. ह्या धूम्रगंधाला एवढा वास असतो की धूर यायच्या आधीच वास येत राहातो. धूर उत्पन्न झाल्यावर वास येतो, ज्या क्षणी धूर यायचा थांबतो त्या क्षणी वास पण थांबतो. जेव्हा कर्मेंद्रियाचा  अनुचित वापर करायला लागतो तेव्हा त्याचा वास आपल्याला यायला लागतो. आमच्या मनामधे संशय यायला लागतो. आमच्या मनामधे परमेश्वराविषयी संशय यायला लागला की कर्मेंद्रियं चुकीच्या दिशेने काम करतात. हा संशय म्हणजे धूर. हा मनातला जो विचार आहे तो म्हणजेच धूम्रगंध. मनामधे श्रद्धा कमी होते. पैशाचं सोंग,धनाचं सोंग, श्रद्धेचं सोंग आणता येतं पण सबुरीचं सोंग नाही आणता येत, भांडं फुटतं. आमच्यामधे पोकळी निर्माण करतं.

त्याचा धाकटा भाऊ धूम्रवदन. याच्यामुळे नुसता वास नाही तर चेहराच धूरकट होतो. संशयाच्या बरोबर संभ्रम उत्पन्न होतो. मोठा भाऊ आधी की लहान भाऊ.

आमच्या मनामधे संभ्रम निर्माण होतो, देव नसलाच पाहीजे. देवाला प्रदक्षिणा घालताना, लोटांगण घालताना देवाला पूजा पोहोचली की नाही हा संभ्रम! परमेश्वराला शिवी पण पोहोचते, तुम्ही गुहेत बसा,दरवाजा बंद करून बसा, जंगलात जा, पण त्याला कळत नाही असं कधी होत नाही. माझी प्रार्थना पोहोचते की नाही ह्याला कळत नाही, असा विचार मनात आला की धूम्रवदन जोरदार कामाला लागला तो मला बुडवणारच हे आम्हांला कळलं पाहीजे. धूरकट चेहरा दिसतो याचा अर्थ दृष्टीमधे धूरकटपणा येतो. परमेश्वराबद्दल संभ्रम उत्पन्न होतो. दृष्टीमधे दोष निर्माण होतो. परमेश्वराबद्दल मलाच clarity नाही, तो स्पष्ट नाही असं आपल्याला वाटतं.

"तुटे वाद संवाद तो हितकारी" संत राम दासांनी सांगितलेलं वाक्य आहे म्हणजे ते खूप महत्वाचं असलं पाहीजे. त्याचा आरोप आम्ही स्वतःवर ठेवत नाही त्याच्यावर ठेवतो. संशय व संभ्रम यामुळे राम बाहेर ढकलला जातो. खर हा रावणाचा भाऊ आहे.

राम जीवनात येण्यासाठी रामनाम वही लिहावी लागते. सेवा करावी लागते. कर्मेंद्रियांचा योग्य वापर करावा लागतो. मग आमच्या जीवनात राम येतो. धूम्रगंध व धूम्रवदन यांचा नाश होतो. रामनाम व रामाची सेवा केल्यानेच हे शक्य होतं. रामनाम धूम्रगंधाचा नाश करतं तर रामाची सेवा केल्याने धूम्रवदनाचा नाश होतो. माझी ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये उचित मार्गाने काम करतात.

आम्ही काळ काम वेगाची गणितं शाळेत शिकलो. एक मोठा हौद आहे, त्याला दोन तोटया आहेत एकातून पाणी बाहेर पडतंय दुसऱ्या नळातून भरतंय, वगैरे. तर किती तासात हौद भरेल? मुलांना छळणारी गणितं. पण हे गणित आवश्यक आहे, काळ काम वेगाचं.

आमच्या जीवनातील रस हे राक्षस काढून टाकतात. कर्मेंद्रियाच्या अनुचित वापराने धूर येतो, मनात संशय निर्माण होतो. ज्ञानेंद्रियाच्या अनुचित वापराने मनात संभ्रम निर्माण होतो. ह्या हौद रिकाम्या करणाऱ्या तोट्या आहेत.

रामाची भक्ती म्हणजे ज्ञानेंद्रियाचा उचित वापर आणि रामाची सेवा म्हणजे कर्मेंद्रियाचा उचित वापर. मग अनंतपटीने तो भरत राहातो.

आमच्या जीवनात या दोन राक्षसांचा नाश होणं आवश्यक आहे, नाहीतर पोकळी निर्माण होते. उदासीनता निर्माण होते. या पोकळीचा मोठा भाऊ कोण तर मी मी करणारा. रावणाचा नाश रामच करतो, खर राक्षसाचा नाश रामच करतो. रामाची सेवा व रामाची भक्ती ह्या हौद भरणाऱ्या तोट्या आहेत. ज्ञानेंद्रियाचा maximum वापर रामनाम वही लिहीण्यासाठी करा.

कर्मेंद्रियाचा maximum वापर सेवा करण्यासाठी करा. मग धूम्रगंध व धूम्र वदन हे राक्षस आले तरी तिथे लढावं लागत नाही. रामच त्यांचा नाश करतो.

परमेश्वराकडे कुणाचंही वाईट करण्याची शक्ती नाही.पण त्याचीकृपा स्विकारण्याची

सुद्धा capacity पाहीजे. त्यासाठी ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियाचा उचित वापर केला पाहीजे. रामायणातील प्रत्येक घटना घडून गेलेली नाही तर प्रत्येक क्षणाला घडतेच आहे. म्हणून धूम्रगंध व धूम्रवदन यांचा नाश होणारच आहे.

 ॥हरि ओम श्रीराम अंबज्ञ ॥

   ॥जय जगदंब जय दुर्गे ॥

 ॥ सद्गुरू श्री अनिरूद्धार्पणमस्तु ॥

          ॥ शुभं भवतु॥