बापूंचे रामरक्षेवरील खूप पूर्वीचे एक प्रवचन, नक्की वाचा!
हरिओम
जङ्घे दशमुखान्तकः-
रावणाचा अंत करणारा राम माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करतो.
पोटऱ्या म्हणजे Calf muscles. बॉडी बिल्डींग मधे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम शिकवले जातात. जुन्या काळामधे मातीचे हौद असायचे. ते स्वतः खणायला लागायचे. त्यामुळे पोटऱ्यांना व्यायाम व्हायचा. 100/150 बैठका मारल्यावर पोटऱ्या मजबूत होतात. आपण म्हणतो ना लाथ मारीन तिथे पाणी काढीन. शरीराचा हा भाग पृथ्वीतत्वाशी निगडीत आहे. चालण्यामुळे तो विकसीत होतो. Powerful होतो. जास्त वेळ बसून राहीलं की पोटऱ्या दुखतात. प्रत्येकाच्या उभं राहाण्याच्या, चालण्याच्या लकबी मधे फरक आहे. स्त्रिया स्मार्ट दिसण्यासाठी वेगवेगळ्या हेअर स्टाइल्स करतात, लिपस्टीक लावतात, पण तुम्ही स्वतःला carry कसं करता ते महत्वाचं आहे. तुमच्या आजुबाजुला जे काही घडत असतं, त्याला apt response, उचित प्रतिसाद देण्याची क्षमता म्हणजे smartness. तुमचं gateup,posture, तुम्ही जसे आहात तसे किती comfort आहात, मन स्थिर आहे का?यावर स्मार्ट नेस अवलंबून असतो. आपल्याला पाठीला पोक काढून बसायची सवय असते. पोक काढून बसल्यावर शरीरातील चक्रं वेगवेगळ्या दिशांनी align होतात. सरळ राहात नाहीत. आत्मविश्वास कमी होतो.ह्यासाठी प्राणायाम कसा करायचा, रससाधना कशी करायची हे ग्रंथामधे दिलेलं आहे. पाठीच्या कण्याला जसं महत्वं आहे, तसंच नीट उभं राहण्यालाही आहे. लहानपणी शाळेत होशियार व विश्राम असं शिकवलेलं असतं. विश्राम म्हणजे दोन्ही हात मागे घेवून पाठीचा कणा ताठ ठेवायचा. सैन्य शिक्षणामधे march past शिकवतात. पायात विशिष्ठ अंतर ठेवून विशिष्ठ गतीने चालायचं. March past प्रत्येकासाठी आवश्यक आहे. पुलाची strength तपासण्यासाठी पन्नास लोकांची सैन्याची तुकडी ब्रीजवरून मार्चपास्ट करीत पाठवतात. ब्रीज कमकुवत असला तर कोसळतो. Regular interval rythem मुळे पूल कोसळतो. मार्च पास्टचं महत्व काय आहे? सदैव युद्धाला तयार राहण्यासाठी ते आवश्यक आहे. सामान्य माणूस किती ठिकाणी लढत असतो, किती पातळ्यांवर लढत असतो. आत्मविश्वास ही आतुन येणारी गोष्ट आहे, बाहेरुन नाही. त्यासाठी पाठीचा कणा ताठ ठेवणं, योग्य पद्धतीनं चालणं आवश्यक आहे.ताणतणाव शिथील करण्यासाठी प्राणायाम सांगितला आहे. माझं posture,gesture ,style बदलली पाहीजे. आम्ही जॉब मिळेपर्यंत व्यवस्थित राहातो, पण एकदा जॉब मिळाला की कसंही राहायचं. मुलगी पटवायची असेल तर व्यवस्थित इन शर्ट, बूट पॉलिश, दाढी वगैरे. पण एकदा लग्न झालं की कसंही राहातो. स्त्रिया सुद्धा लग्नाआधी सौंदर्य साधना करतात मग सोडून देतात. स्मार्ट राहायचा, स्मार्ट वागायचा, बोलण्याचा प्रयत्न करा. साधा व बावळट यामधे फरक आहे. नीट उभं राहाणं, चालणं यासाठी चांगल्या माणसाची कॉपी केली तर काय हरकत आहे?टापटीप राहायला पाहीजे. चालणं, उभं राहाणं यामधे पोटऱ्यांचा खूप सहभाग आहे. पोटऱ्यांचे स्नायु strong असतील तर चालण्यामधे डौल आपोआप येतो. काही लोक चालण्याची style सुधारण्यासाठी डोक्यावर पुस्तक ठेवतात. मान दुखते पण style सुधारत नाही. चालण्यात grace पाहीजे. आपण दुसऱ्यांवर टीका करतो, तो असाच आहे, फेंगडा, वाकडा! रुप कसं आहे, सौंदर्य किती आहे ह्यावर काही अवलंबून नाही.जी माणसं smart असतात ती सुंदरच दिसतात. सौंदर्य उचित आत्मविश्वासावर अवलंबून असतं. पोकळ बढाया, फुशारक्या मारणे म्हणजे स्मार्टनेस नाही. काही लोक पैसे उसने घेतात परत देत नाहीत. वचन देतात निभावत नाही. दहा जणांना फसवतात ह्याला आत्मविश्वास म्हणत नाहीत. आत्मविश्वास म्हणजे काय तर मी exactly काय करू शकतो त्याचा अंदाज घेवून ते कार्य पार पाडणे. मी दहा फूट उडी मारू शकतो हे माहीत असताना एकदम पंधरा फूट मारली तर नक्कीच आपटणार. पण मला दहा फूट उडी मारता येते तर मी नऊ फूट मारीन मग हळूहळू वाढवीन असे करणे म्हणजे आत्मविश्वास! ज्याला आत्मविश्वास असतो तो संकटांना घाबरत नाही, आणि चुकीच्या मार्गावर जात नाही.जे आपल्याला मिळत नाही ते हवंहवंस वाटतं, पण आपल्याला मिळत नाही म्हणजे ते आपल्या साठी उचित नाही, मग त्यापेक्षा चांगलं मिळणार असं वाटणं म्हणजे आत्मविश्वास.
पापी,कपटी लोकांना आत्मविश्वास कमी असतो. गुंड भयाने ग्रासलेले असतात. हातात शस्त्रं घेतल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाहीत. आत्मविश्वास नसल्यामुळे शस्त्राचा धाक दाखवून इतरांना घाबरवतात. ज्यांना आत्मविश्वास आहे तेच प्रारब्धाशी टक्कर देवू शकतात. लढल्याशिवाय नशीबावर विजय मिळत नाही. दशमुख असलेला रावण म्हणजेच आपलं प्रारब्ध. जीव व जीवात्मा म्हणजे काय ते मागच्या वेळेस सांगितलं. आत्मविश्वास नसेल तर रावण जिंकतो. राम वाईट प्रारब्धाचा नाश करतो, कारण राम आमचा आत्मविश्वास वाढवतो, तोच मदतीला येतो आमचा विकास करण्यासाठी. रामाचे दोन चरण घट्ट पकडून ठेवावे लागतात. रामनाम मुखी धरलं की राम आमचा आत्म विश्वास वाढवत राहातो. रामनाम घेणाऱ्याच्या जवळ भूतं येत नाहीत. रामनाम ही आत्मविश्वास वाढवणारी शक्ती आहे. पायी चालताना रामनाम घ्यायचं. मॉर्निंग वॉकला गेल्यावर प्रत्येक पावलाला रामनाम घ्यायचं. दिवसभरातून एक तास चालायचंच व प्रत्येक पावलागणिक रामनाम घ्यायचं. थोडया दिवसांमधे काय फरक होईल बघा. बसणं, चालणं, वागणं सुधारेल. आपण रससाधना करत नाही, प्राणायाम पण करत नाही. Gym मधे जाऊन उंदीर, झुरळ यांना सुद्धा घाबरत असेल तर काय उपयोग? राम नामाने मात्र आत्मविश्वास वाढतो. शरीर मन बुद्धी या तीनही पातळ्यांवर ताकद वाढते. रस साधना प्रत्येक गोष्ट बदलून टाकते, आत्मविश्वास वाढवते. चालताना प्रत्येक पावलागणिक रामनाम घेतलं, एकही पाऊल विसरलं नाही की मग खरी तयारी झाली असं समजायचं. अशाने मनाची, शरीराची, बुद्धीची ताकद वाढते. भरपूर आत्मविश्वास वाढतो. अडथळ्यांवर मात करता येते. सुंदर स्तोत्रं म्हणणंही आवश्यक आहे. शरीरामधे असंख्य harmones ,enzymes आहेत. त्याच्या बदलांमुळे गोष्टी घडतात. शरीरातील विद्युत प्रवाह व्यायामावर अवलंबून असतो, शरीराला कसं ट्रेनिंग देतो त्यावर सगळं अवलंबून असतं.
आत्मविश्वास नसेल त्यालाच रावण गांजतो. घटना कशी घडते? कपटवेश धारण करून रावण येतो, जी स्वतःच मर्यादा स्वरुपिनी आहे तिला कर्माचा अटळ सिद्धांत चुकत नाही. साक्षात राम तिला सांगतो, आत्तापर्यंत सोन्याचा मृग कधी पाहीलेला नाही. पण तरी तिला मोह पडतो. ती लक्ष्मण रेषा पण ओलांडते. मर्यादा तोडते. मग रघुपतींचा विरह होतो. ज्याने मर्यादा तोडली त्याच्या प्रत्येकाच्या नशीबामधे हेच असतं.सीतेचा आत्मविश्वास कमी होता का?अजिबात नाही. पण सीता मर्यादा तोडते. मर्यादा तोडणे व आत्मविश्वास ह्याचा संबंध आहे. नाहीतर रावणाची काय हिंमत होती सीतेला पळवून न्यायची ! लंकेमधे तो रावण सीतेला हातही लावू शकत नाही.
सीता मर्यादारुपिनी आहे व राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. जो मर्यादा पालन करतो तोच आत्मविश्वासपूर्ण असतो. तेव्हाच विकास होतो. नुसता विकास नाही तर उन्नती होते. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे म्हणूनच तो आत्मविश्वास वाढवतो. कर्ता रामच आहे. ओज देणारा फक्त रामच आहे,108%. मला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर मर्यादा मार्गावरून चालायला पाहीजे. तो भगवंत अमर्याद आहे, हे ओळखून शरण जायला पाहीजे.
॥ युद्धकर्ता श्रीरामः मम, समर्थ दत्तगुरू मुलाधार :,साचार : वानर सैनिकोहम् रावण मरणार निश्चितः॥
मर्यादामार्गावरचं पहिलं पाऊल म्हणजे रामाला शरण जाणं. रामाचा वानरसैनिक बनण्यासाठी जे जे काही आहे ते सगळं करणं. सदैव आनंदी राहाणं. वानर सैनिकाची गोम काय असते, ते सदैव रामनाम घेतात, रामाच्या कार्यात सहभागी होतात. लढाई संपल्यावर रामराज्य फक्त अयोध्येत नाही तर लंकेत आणि किष्कींधानगरीत पण स्थापन झालं. म्हणजेच तीनही पातळ्यांवर स्थापन झालं. सात्विक, तामसिक व राजस ! रामाचं चरित्र स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवून आचरण करणारा प्रत्येक जण वानरसैनिकच असतो.हनुमंताची copy करतो. मग हनुमंत त्याचा मार्गदर्शक बनतो,leader बनतो. एकटा हनुमंतच आधी लंकेत जाऊ शकतो. काय ताकद आहे त्याची! आपण काय करतो? हनुमंताच्या डोक्यावर तेल ओततो. रामाच्या चरणांवर फुलं वाहतो, नवस बोलतो की झालं. हातावर हात ठेवून स्वस्थ बसून काहीही साध्य होणार नाही. आम्ही स्वतः प्रयास न करता, भक्ती न करता स्वतःच्या गरजेला जास्त प्राधान्य देतो. आपलं फक्त डोकंच दुखतंय आणि दुसऱ्याला ट्युमर झालाय तरी स्वतःचंच डोकं धरून बसणार! स्वतःचाच स्वार्थ बघतो आपण.
देवळामधे दर्शनासाठी दिवसभर रांगा लावणारे पण असतात आणि रात्री आठनंतर देव दर्शनासाठी येणारे पण असतात. पहील्या प्रकारच्या लोकांकडे तेवढा वेळ असतो. दुसऱ्या प्रकारचे लोक परिश्रमांना प्राधान्य देतात. देवालाही अशी पूजा आवडते. स्वतःच्या जीवनाचा विकास करण्यासाठी प्रत्येक जीवात्मा उन्नत होत त्याचा दिव्यात्मा व्हावा हीच परमेश्वराची इच्छा असते. उन्नती परिश्रमांशिवाय होत नाही. वानर सैनिक बनण्यासाठी उचित परिश्रम व अभ्यास यांचीच आवश्यकता असते. आपल्या जीवनात उचित बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येक जण वानर सैनिक बनू शकतो. ती ताकद परमेश्वराची आहे.
मी फक्त पैसेच मिळवत राहीलो आणि देवाला खूप आयुष्य मागितलं, समजा1000 वर्ष, तर किती कंटाळा येईल मला सांगा. तुम्हांला बघायला तिकीट लावून पैसे मिळवतील, हा बघा 900 वर्षांचा म्हातारा. किती भयानक होईल ते दुःख. वर्षानुवर्ष तेच बघायचा कंटाळा येईल.जे शाश्वत आहे तेच स्विकारा. वेळ फुकट घालवू नका, ते अमूल्य धन आहे. आळस करू नका. चालण्यामुळे आपली प्रगती होते. ज्या दिवशी चाललो नाही त्या दिवशी थोडं कमी खा. चुकीच्या व्यक्तीच्या संगतीत राहाणं, चुकीच्या व्यक्तीच्या पाया पडणं टाळा. याने आपला आत्मविश्वास कमी होतो. मुलांचे फाजील लाड करू नका आणि त्यांना सारखे दोषही देवू नका. त्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. एक तर बेसुमार लाड करतात किंवा ठोकतात. समतोल राखता यायला पाहीजे. मुलं अठरा वर्षांची झाली की मुलगी आईची मैत्रीण झाली पाहीजे व मुलगा बापाचा मित्र झाला पाहीजे. याने communicate करता यायला पाहीजे. जग कसं आहे हे सांगता यायला पाहीजे. रामायणाचा मार्ग बिकट आहे पण शेवट सुखाचा आहे. मर्यादा पालनानेच सुख मिळतं. महाभारतामधे शेवटी दुःखंच वाट्याला येतं
तुम्ही म्हणाल 'बापू तुम्ही खूपच उदाहरणं देता" .... माझी वृत्ती कशी आहे? ऐकायचं असेल तर ऐका नाही तर गेलात उडत.
चौदा पंधरा वर्षांची मुलं खूप प्रश्न विचारतात.hormones च्या बदलांमुळे आत्मविश्वास वाढलेला असतो, बंडखोर बनतात. Arguments करतात. आपण खूप Great आहोत असं वाटतं. हातुन चुका होतात. अशा वेळी मुलांना समजुन घेतलं पाहीजे, प्रेमाने योग्य मार्ग दाखवला पाहीजे. उचित ठिकाणी कानफटात मारली तरी ते प्रेमच असतं. याचा अर्थ असा नाही की बापूंनी सांगितलंय दररोज सकाळी एक कानफटात मारायची म्हणजे प्रेम! समजून घ्या राजांनो !
मुलीला सासरी पाठवताना मुलीला bias करुन पाठवतात. "नणंद, नवरा, सासू, सासरे हे अस्सेच असतात", "म्हातारी बेरकी दिसतीये. नवऱ्याला मुठीत ठेव." स्वतःच्या मुलीला हा उपदेश !पण मुलाला मात्र सांगायचं "पायातली वहाण पायातच ठेव ! डोक्यावर चढवून ठेवू नको!"
जी चांगली आई असते ती मुलीला सांगते "एक दोन वर्ष तू adjust कर , होईल सगळं व्यवस्थित ! तुला काही लागलं तर आमचा support आहे." अशा मुलींचा आत्मविश्वास वाढतो. चांगल्या मार्गाने गेल्यावरच यश प्राप्त होतं.
रामाला शरण गेल्यावरच आत्मविश्वास वाढतो. रावण फक्त दुःखच देत राहातो, भीती वाढवतो. खरा निर्भय म्हणजे हनुमंत ! बिभीषण व सुग्रीव केव्हा निर्भय होतात ? जेव्हा ते रामाला शरण जातात तेव्हाच !
॥ हरिओम श्रीराम अंबज्ञ
॥जय जगदंब जय दुर्गेII
शब्दांकन -मंजुषावीरा टप्पू
शिवाजीनगर पुणे केंद्र