Sunday, October 26, 2014

"अंबज्ञ" का म्हणायचे ?

"अंबज्ञ" का म्हणायचे ?
परमपूज्य बापूंनी समजावून सांगितलेले ‘अंबज्ञ’ शब्दाचे महत्व....
1. जी व्यक्ती ‘अंबज्ञ’ शब्द उच्चारते ती त्याक्षणी अंबज्ञच असते.
2. कोणी तुमची चूक नसतांना तुमच्यावर दोषारोप केलेत, तुम्हाला शिव्या घातल्या तरी ‘अंबज्ञ’ म्हणा, ते दोषारोप आईच्या चरणी अर्पण होतील. आपलं जीवन ‘अंबज्ञ’ झालं पाहीजे.
3. सकाळी उठल्यावर म्हणा - ‘अंबज्ञ’ , सकाळी पोट साफ झाल्यावर म्हणा ‘अंबज्ञ’ , रात्री झोपताना म्हणा -
आमचा दिवस नीट गेला ‘अंबज्ञ’, जेवण जेवायच्या आधी, जेवण झाल्यावर म्हणा, ऑफिसमधून घरी गेल्यावर म्हणा, घरून
ऑफिससाठी निघताना म्हणा, वस्तू विकत घेतली की म्हणा, पगाराचं पाकीट मिळालं की म्हणा. आपोआप ‘अंबज्ञ’ यायलहवं.
‘अंबज्ञ’ शब्द मनांत रुजू होऊ देत.
4. आपली कोणी स्तुती केली की आपण ‘श्रीराम’ म्हणतो Thanks ऐवजी ‘अंबज्ञ’ म्हटलं तर ज्याला म्हणतो त्याचा आणि आपलाही फायदा आहे.
5. जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा ‘अंबज्ञ’ म्हणा, आजूबाजूला शंभर माणसं असली तरी एकटं वाटू शकतं.
एकटेपणा मानसिक आहे, ऐहिक आहे - जेव्हा ‘अंबज्ञ’ म्हणाल, त्याच क्षणाला तुमचं एकटेपण संपलेलं असेल.
कधीच स्वत:ला एकटं समजू नका. त्या क्षणाला तुम्ही एकटे नसणारच. १०० टक्के. माझा गुरु माझ्याबरोबर आहेच.
6. रस्त्यावरून जाताना एखादा accident पाहिलात, वाईट गोष्ट बघितली तरी ‘अंबज्ञ’ म्हणा का? तर ही वाईट गोष्ट आमच्या जीवनात घडली नाही म्हणून.
ज्याच्या जीवनात ती घडतेय तो तुमच्या धर्माचा नसला तरी, तुम्हाला ओळखत नसला तरीसुद्धा त्याला ह्या ‘अंबज्ञ’ चा फायदा होईल आणि आम्हाला एका असहाय्य माणसाला मदत केल्याचं पुण्य लाभेल.
7. परीक्षेत नापास झालात, आपल्या मनाविरुद्ध घडलं, अपयश मिळालं तरी ‘अंबज्ञ’ म्हणा. मनाविरुद्ध घडलेली गोष्टसुद्धा फायद्याची ठरेल.
8. ह्या शब्दाचा प्रवास नीट चालला पाहिजे....
9. 123 - अं ब ज्ञ

Barakhadi mdhe..
अ ha pahila akda ahe.
Ani अं ha shevtcha.
Mhnje pahila n last asnara ha ekch ahe.
Tasach ज्ञ ha shwvatcha akada ahe.
Bhgwant ti kalji gheto. Pn jvha apan AMbadnya asu tevhach. Hya trivikramch n ambdnyatech atyant javalch naat ahe.
"""..... अंबज्ञ....."""

No comments:

Post a Comment