Saturday, May 23, 2015

बापूंचे प्रवचन 21/05/2015

हरि ॐ दिनांक 21/05/2015    बापूंचे प्रवचन

श्रीस्वस्तिक्षेम संवाद होऊन किती दिवस झाले? एवढे दिवस आपण करतोय..असा संवाद ही 'भारताची परंपरा आहे'..भारतीय ऋषींनी दिलेली ही देणगी आहे..कि तुम्ही direct (थेट) संवाद साधू शकता.. हे श्रीसुक्त काय आहे? हा लोपामुद्रा आणि जगदंबे मधला स्वस्तिक्षेम संवाद आहे..म्हणुन नेहमी 'संवाद' नंतरच हे श्रीसुक्तम् म्हटले जाईल..

हरि ॐ

श्रीश्वासम् उत्सव मी अत्यंत enjoy केला स्वत: ..पण त्याच बरोबर..ज्याने मनापासुन..कधी नाही इतकी मनापासुन प्रदक्षिणा घालताना बघितलं.. आईच्या प्रतिमेकडे बघताना परत परत बघितलं..मला खुपच छान वाटलं..आतमधे ऐकताना प्रत्येकाचा भाव खुप शांत होता..हे बघुन खुप छान वाटलं..'गुह्यसुक्त' ह्या शब्दामधे खुप ताकद आहे..ह्याची खरी ताकद कधी मिळते, तर जेंव्हा आपण शांतपणे ऐकतो..आणि तेंव्हा आपोआप श्वास होतो.जेंव्हा जेंव्हा गरज वाटेल..तेंव्हा शांतपणे लावुन शांत बसायचं आणि ऐकायचं..तेंव्हा ते अधिक वेगाने काम करेल!! संख्यात्मक, गुणात्मक दृष्ट्या ते काम करेल..इकडे तिकडे काम करताना ऐकलं, तरी तेंव्हा पण उपयोग होईलच..पण 10-15 मिनिटे तरी शांत ऐका..त्याचा अतिशय सुंदर फायदा प्रत्येकाला होईल..
मुषक 4 होते..1 मी काढून दिलेला..
मुषक म्हणजे गणपतीचे वाहन..गणपती म्हणजे घनप्राण..आणि त्याचं स्थुल स्वरूप म्हणजे 'श्वास' आणि मुषक, श्वासाचं प्रतिक..
श्वासातुन विश्वाची energy (उर्जा) आपल्यात ओढत असतो..
श्वास चार प्रकारे घेतो..संस्कृत भाषेत त्याला
पुरक (आत घेतो तो)
आंतरकुंभक (थोडा वेळ हवा आतच ठेवतो, तो काळ)
रेचक (बाहेर सोडतो तो) आणि
बाह्यकुंभक (बाहेर सोडल्यानंतर पुन्हा श्वास घेण्याआधी, मधला काळ)
जो मिळाला होता, तो 'बाह्यकुंभक'..पुढचा श्वास द्यायचा कि नाही.. ते 'तो' ठरवतो..म्हणुन ती जबाबदारी तुमच्यावर टाकली नाही..बाकी 3 कधीचे होते..प्रत्येकाचे आयुष्य separate (वेगळे, स्वतंत्र) आहे..प्रत्येकाचा प्रवास आणि प्रगती ज्याची त्याच्यावर अवलंबुन असते..आपण त्याची सेवा करू शकतो..त्याच्यासाठी उपासना करू शकतो..पण तरी 100% मधील 70% ज्याचा त्यालाच करावा लागतो..
आणि हे चार ही भाग आपण गणपतीला अर्पण केले..आणि मग उत्सव केला..
ती मांडणी..
काही लोक प्रश्न विचारतात गुरूवारी..दर्शन घेताना..पण मी उत्तर देणार नाही..कारण..मी एकाला उत्तर दिलं तर दुस-याला वाटतं, 'मलाच दिलं'..आणि त्यातुन चुकीचे अर्थ होतात.. ज्याला नाही सांगितलं, त्याला 'हो' वाटतं..म्हणुन इथे खुणेने प्रश्न विचारू नका..
इथे श्रीहरिगुरूग्राम मधे श्रीश्वासम् च्या वेळच्या दोन 'झाली' (कमानी) आहेत..पुढच्या गुरूवारपासुन मी स्वत: इथे..तुम्ही जेंव्हा दर्शन घेत असाल, तेंव्हा मी इथे 'जप' करीत असेन.. (कोण काय करतं, ते मला नीट कळतं..माझे गुप्तहेर आहेत..) त्यांच्याकडून मला कळलं कि..माझी ही पोरं खुप मेहनत घेतात..उपासना करतात..त्यामुळे माझ्या प्रत्येक 'लाडक्या' श्रध्दावानासाठी मी अभिषेक करणार आहे..जप करणार आहे..सगळ्याच्या सगळ्या  श्रध्दावानांसाठी ..करणार आहे..आणि तो अभिषेक त्या 'झाली' वर पण किंवा पाणी शिंपडेल..त्या 'झाली' श्रीश्वासम् मधे सिध्द झाल्या आहेत..
आणि म्हणुन मी कोणाशी बोलणार नाही.. 'झाली' खालुन जाणा-या प्रत्येकासाठी..जेवढा विश्वास जास्त..तेवढी प्राप्ती जास्त..
उद्या तुम्ही म्हणाल, तुमच्यावर विश्वास आहे, पण नंदाई किंवा सुचित दादा किंवा समीर दादांवर नाही..तर त्याचं फळ 'शुन्य'
मी समीर दादा, सुचित दादांना निवडलंय, हा माझ्या 'आई'चा निर्णय आहे..आणि माझी अन् नंदाईची साथ ही सुध्दा 'आई'ची निवड आहे..
म्हणुन, विश्वास हा विश्वास आहे..
चौघांवर विश्वास असेल, तरच इथे यायचं..नाही तर यायचं नाही.. get out..
मला कोणाची गरज नाही..मला माझ्या बाळांची काळजी आहे..पुढच्या गुरूवार पासुन 'तपश्चर्या' फक्त तुमच्यासाठी आहे..
मी जो कोणी आहे..जसा आहे..त्यात माझ्या पत्नीचा equal (समान) सहभाग आहे..आणि तेवढाच दादांचा..
येणा-या काळामध्ये..ह्या भारत देशाला.. ह्या हिन्दू राष्ट्राला..ह्यांना प्रचंड धोका आहे..हिन्दू, शिख, जैन ह्या भारतातल्या मातीतल्या धर्मांना प्रचंड धोका आहे..
आपल्याला आता अतिशय strong (समर्थ) बनायलाच हवं..भीती काढण्यासाठी सांगतो..शेवटी 'विजय महाभारताचाच' आहे..
जर कोणी कर्मदरिद्री पणाने, लांब राहील, किंवा जो माझ्याशी 'खोटं' बोलतो; त्याचं 'मी' संरक्षण' करणार नाही..
मी संरक्षण त्याचंच करीन, ज्याचा पुर्ण विश्वास आहे. पुर्ण म्हणजे पुर्ण.. आईसह भांडण झाले, तरी ती 'आई' आहे, हे मानलं पाहिजे..विश्वासाचा गळा दाबू नका..जगात बाहेर काय काय घडतंय..हे आपल्याला माहित आहे..ह्या परिस्थिती मध्ये आपल्याला विजयी होऊन, सुखाने आणि कमीत कमी कष्टाने बाहेर पडायचंय..आणि त्यासाठी 'विश्वास' पाहिजे..
मी एकटा capable (समर्थ) आहे सगळ्यासाठी..पण विश्वास असणं.. हे भौतिक गोष्टींसाठी आवश्यक असतं..
म्हणुन मी 'जपाला' बसतोय..ह्याचा अर्थ, मी तुमच्यावर उपकार करतोय, असं कधीच बोलू नका..प्रेमाने प्रेमासाठी केलेली प्रेमळ गोष्टं कधीच उपकार नसते..
आम्ही येऊ शकलो नाही 'झाली' खाली..तरी जो मनापासुन विश्वास ठेवतोय..त्याला आपोआप 'झाली' (कमानी) खालुन कसं न्यायचं, मला माहित आहे.. आणि कधी ख-या कारणामुळे जमत नसेल, तर तुमच्यासाठी मी स्वत: जाईन 'झाली'खालुन..पण तुम्हाला 'ते' बघण्यासाठी तिसरा डोळा लागेल..
पुढच्या गुरूवार पासुन.. आमचा सख्खा बाप आमच्यासाठी उपासना करणार आहे..त्या उपासनेतील पाणी, पान; हे त्या 'झाली'वर पडतील..
'आत' शिरताना तुमच्या "औरा"मधील defects (दोष) minimize (कमी) करण्यासाठीचे कार्य..त्या 'झाली'खाली होईल..आणि ज्या चांगल्या गोष्टी तुमच्यात कमी असतील, त्या टाकण्याचे काम बाहेर पडताना होईल..

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे
मी अंबज्ञ आहे..
आम्ही अंबज्ञ आहोत..

No comments:

Post a Comment