My Blog List

Friday, June 5, 2015

4/6/2015 बापूंचे प्रवचन

हरि ॐ दिनांक 4/6/2015      बापूंचे प्रवचन

उपनिषद वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर मणिद्वीपचं चित्र येतं..मग तुम्हाला वाटतं कि नाही, आपण त्या मणिद्विपात बसलो आहोत..माझी लायकी आहे कि नाही, हे विचार न करता; आपण तिच्या मणिद्विपात बसलो आहोत, अशी कल्पना करायला पाहिजे..आणि जेंव्हा जेंव्हा आपण तिच्या प्रतिमेसमोर बसतो; तेंव्हा असाच भाव असला पाहिजे की, "आपण तिच्या मणिद्विपात बसलो आहोत"
चंद्रां हिरण्यमयीं
लोपामुद्रा म्हणते की ज्याच्या आजुबाजुला असलेला प्रकाश म्हणजे सुर्याप्रमाणे तो प्रकाश तीव्र नसतो, तर तो प्रकाश; सौम्यच आहे..
पण त्याच्याही पलिकडे जाऊन लोपामुद्राला, काहीतरी सांगायचे आहे..

लोपामुद्रेचा मंत्र, 15 अक्षरांचा आहे..आणि 16 वे अक्षर हे 'लक्ष्मी किंवा सद् गुरूच असतो..

15 अक्षरं, म्हणजे 'बीज' आहेत ज्यांना नित्य म्हणतात..आणि जेंव्हा ह्या 15 नित्य पुर्ण झाली; की मग ती "सोळावी, म्हणजे 'ती' आई येते"

चंद्राच्या कला 15 आहेत आणि 16 वी कला म्हणजे अमावस्या आहे.आईच्या मंत्राची कला '16' वी, ही अमावस्या नाही..

आमची इच्छा काय असते? तर ही लक्ष्मी, अनपगामिनीम् म्हणजे; आमच्यापासुन कधीही दुर न जाणारी असावी..

अमावस्येच्या दुस-या दिवशी चंद्राची कला कमीच दिसते. आणि मग 15 दिवसांनंतर ती पुर्ण दिसुन येते.

जशी चंद्राची कला कमी होत जाते तसं त्याच्या आकाशातील अनेक तारे चमकायला लागतात..आणि अमावस्येच्या रात्री खुप तारे असतात..

आम्हाला लक्ष्मी कशी हवी असते? चुटकी वाजवली कि, ती यायला हवी म्हणजे आपल्याला कमी श्रमात आणि कमी वेळेत लक्ष्मी हवी असते पण तो लक्ष्मीचा मार्ग नाहीच!

आपल्याला लक्ष्मी, 'अनपगामिनिम्' हवी असेल तर चंद्राप्रमाणे तिला स्विकारायला हवं..
आपल्याला पैसा चटकन हवा असतो..मी गेली 16 वर्ष सांगतोय, की कोणत्याही स्किम मधे पैसे गुंतवू नका.. पण तरी आपल्या मोहामुळे आपल्या डोळ्यांवर पडदा पडतो..
आणि मग '20 वर्षांनंतर जागा नाही मिळाली' तर मग देवाला शिव्या घालतो..
झटपट पैसा मिळवण्याची स्किम तुमच्याकडे आली तर 'त्यांना सरळ हात जोडायचे..कारण त्यात success (यश) कधीच नसतं..

माणसात, 'ठग' अनेक जण असतात आणि अश्यांना आपण का बळी पडतो? अश्या ठगांना बळी पडू नका..
मग इथे imp (महत्वाचे) काय आहे? तर 'चंद्राम्' म्हणजे step wise progression. (पायरी-पायरी ने प्रगती)

ज्या व्यक्तीने बँकेकडून Loan (कर्ज) घेतलंय आणि त्याने वेळच्या वेळी ते loan (कर्ज) फेडलंय, तर मग ते बँक वाले स्वत: येऊन त्याचे काम घरी करतात; कारण त्याचा business (व्यवसाय) नीट चालु आहे.

7 दिवसात इंग्लिश शिका, असं कधीच शक्य नाही..spoken & written language (बोलणं आणि लिहीण्याचं केंद्र एकच आहे..कोणी ही कितीही हुश्शार असलं; तरी त्याला इंग्लीश चांगल्या प्रकारे येण्यासाठी त्याला कमीत कमी 6 महिने लागतातच!
आम्ही ह्याच्या मागे जातो आणि आपल्याला 'अनपगामिनी' हवी असते, पण येतं कोण? तर त्या लक्ष्मी ची बहिण अवदसा येते..आणि ती चुकीच्या मार्गाने पैसे आणते..

मीना वहिनीं नी सांगितलंय की

आता कैसी अमावस्या.. नित्य अनिरूध्द पोर्णिमा..

पण हे कधी घडेल? जेंव्हा आपण अनिरूध्दाचे होऊ तेंव्हाच..
आपण cheating (लबाडी) करायला लागलो; की देव cheating (लबाडी) करत नाही, तर देव आपल्यापासुन अलिप्त होतो..

त्याच्याशी खोटं बोलू नका आणि त्याच्या'विषयी' खोटं बोलू नका..

साई चरित्रामधे आपण दामू अण्णाची गोष्टं पहातो..
त्यात शामा, बाबांना दामू अण्णाचं पत्र वाचुन दाखवतो; तर बाबा म्हणतात की आपल्याला नाही करायचं हे..पण शाम्याच्या मनात बाबांना कमीशन (पाती) देण्याचं असतं!!..
काही काळानंतर त्यांचा business partner (व्यवसाय भागीदार) धुळीला मिळतो पण शामा चं नुकसान नाही होत!

'चंद्राम्' ह्याचा मुळ अर्थ आहे 'तू जे काही ह्या सृष्टीमधे चांगलं होतं, ते म्हणजे ऋत'..म्हणजे जी आपला ऋत maintain (व्यवस्थित) करते ती, जी आपला श्वास maintain (नीट) करते ती, म्हणजे 'चंद्राम्'...

पाऊस पडून गेला, तर जमीन लगेच कोरडी होते का? नाही नं..काही वेळ जायलाच पाहिजे..हा त्या निसर्गाचा नियम राखलाच पाहिजे..

तुमच्या घरात दागिने असतील तर ते तुम्ही लॉकर मधे नेऊन ठेवता..तुमच्यासाठी दागिने अदृष्य होतात; पण ते सुरक्षित असतात..

हिचं अस्तित्व चंद्रासारखं आहे..जे आपल्याला योग्य आहे, ते-ते ती देणार आहे..पण आपला धीर रहात नाही..
मग आपण इथे त्या त्रिविक्रमाला आवाहन करायचं आहे..

आणि ती लक्ष्मी क्रमशील मार्गाने येणार आहे..कारण त्या त्रिविक्रमाच्या नावातच..क्रम, विक्रम आणि त्रिविक्रम आहे..

केवळ एक माणुस श्रीमंत झाला, तर मत्सराने त्या व्यक्तिला कधीच असं म्हणायचं नाही कि, "त्याने चुकीच्या मार्गाने मिळवला असणार"..असा दोष देऊ नका..कारण जर त्याने तो पैसा चांगल्या मार्गाने मिळवला असेल तर तो दोष त्या माणसाला नाही लागत तर त्या लक्ष्मी ला लागतो..

तेंव्हा असं म्हणा, कि "देवाला माहित"

तेंव्हा जय जगदंब जय दुर्गे असं म्हणुन सोडून द्यायचं..

कारण ते करताना तुम्ही लक्ष्मी ला दोष देत असता..आणि तिला दिलेला दोष, त्या महाविष्णूला आवडत नाही..कारण जिथे महाविष्णू नसेल, तिथे ती लक्ष्मी नसेलच..

मॅगी खाल्ल्याने लहान मुलांचं अभ्यासात लक्ष नाही लागत..50 वर्ष वय असलेल्या माणसाने खाल्ली तर त्यांना सुध्दा बराच त्रास उदभवतो..मग आपण का खातो?? फक्त चव चांगली आहे म्हणुन??
इथे आहेत, त्यातल्या 172 जणांनी मॅगी खाल्ली आहे, मग आता तरी ती खाणं सोडा..
हे असं का घडलं??
1) बायका, मुलांना जेवण बनवुन द्यायचा आळस
     करून त्या मुलांना मॅगी देतात
2) जेवणाच्या वेळेसच ह्या मॅगीच्या ad (जाहिराती)
     लागतात..

देवाने तुम्हा स्त्रियांना वरदान दिलेय..मातृत्वाचं..मग ते चांगलंच आहे नं..त्याचा विचार करा..

मग कधी बायको ला बरं नाही, म्हणुन नव-याने त्या दिवशी चहा दिला तर तिला आवडेल नं..पुरूषांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही त्या बाजुने विचार केला पाहिजे..

लक्ष्मी आणि अन्नपुर्णा आणि परमशिव आणि प्रजापती ब्रम्हा वेगळे नाहीत तर एकच आहेत..आणि बळकट मन तर बळकट शरीर...

लक्ष्मी आणि अन्नपुर्णा ह्या एकच आहेत..
आपल्याला आपल्या आयुष्यात लक्ष्मी हवीय, अधिक पैसा मिळवणे चांगलंच आहे पण तो 'क्रमाने' मिळवा, श्रम करून मिळवा..

थोड्या वेळेत खुप पैसा मिळवणे, जास्त टिकणारे नसते..
मी माझ्या आईला cheat (फसवलं) केलं तर तिला कळणार नाही! पण तसं नाही; त्या 'मोठ्या आईला' आणि तिच्या 'पुत्राला' कळतंच..

प्रत्येकाच्या मनाचं connection (जोडणी) येऊन ते त्या परमात्म्याशी जोडलंच जातं..

ईश्वराचा धाक असलाच पाहिजे..
अलक्ष्मी, नेहमी दु:खच घेऊन येते..ह्या विश्वावर राज्य, फक्त त्या आदिमातेचंच आहे..
आपण जर ह्या चंद्राच्या मार्गाने पुढे गेलो तर आपल्याला अपेक्षित नसलेलं सुध्दा आपल्याला चांगलंच मिळेल..

- एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरू ऐसा..

- माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते..

गुरूक्षेत्रम मंत्र, हा आपल्याला नेहमीच आधार देणारा आहे..आणि हा गुरूक्षेत्रम मंत्र म्हणजे त्या त्रिविक्रमाचं मंत्रमय स्वरूप आहे..

त्यातला तो 'अनिरूध्द' म्हणजे तो 'श्रीविद्येचा पुत्र म्हणजे त्रिविक्रम'

हरि ॐ

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे

मी अंबज्ञ आहे
आम्ही अंबज्ञ आहोत...

No comments:

Post a Comment