नंदीपक्ष
अर्थात शिवपंचाक्षरी स्तोत्र पठण आणि वालुकेश्वर पूजन.
नंदीपक्ष, महाशिवरात्रीच्या सात दिवस आधी आणि नंतर सात दिवस आणि महाशिवरात्रीचा दिवस धरुन जो पंधरवडा असतो त्याला नंदीपक्ष असे म्हणतात.
नंदी नावाच्या एका ऋषीने हे शिवपंचाक्षरी स्तोत्र रचून व त्याचे पंधरा दिवस सतत पठण करुन परम शिवाची आराधना केली. त्यामुळे ह्या पंधरा दिवसाना नंदीपक्ष नांव पडले आणि पक्ष म्हणजे पंधरवडा पवित्र मानला गेला.
आराधना ज्योती ६२ मधील शिवपंचाक्षरी स्तोत्र बापूनी आपल्याला ह्या पंधरा दिवसांत दर दिवशी निदान एकदा तरी म्हणायला सांगितले होते तसेच जो कोणी ५, ११, २१ किंवा त्याहून अधिक वेळा म्हणू शकला तर फारच चांगले.
जितक्या वेळेला पठण कराल तेव्हढे चांगलेच पण निदान तीन दिवस पठण केले तरी, निश्चित फळ प्राप्त होते… असे बापूंनी प्रवचनात सांगितले होते.
No comments:
Post a Comment