My Blog List

Friday, February 6, 2015

Parvachan dated 5th February 2015 ; चिकाटी

हरि ॐ दि. 5/2/2015 बापूंचे प्रवचन

अवघाचि संसार सुखाचा करीन...
चिकाटी... आपण पहात आहोत..

एक म्हण आहे..
"वाळूचे कण रगडता तेल ही गळे"
वाळूचे कण रगडले तरी त्यातुन तेल येत नाही..म्हणजेच काय.. आपली चिकाटी नेहमी यशस्वी का नाही होत, कारण आपलं ध्येय फिक्स नसते. प्रयत्न म्हणजे चिकाटी नाही..आपण म्हणतो मी तबल्याचा क्लास केलाय, आणि हा क्लास तो क्लास केलाय..रोज 100 प्रयत्न करणे म्हणजे चिकाटी नाही..ज्या कामाला सतत करणे म्हणजे ती चिकाटी नसते..

एक व्यक्ती आहे जी गात असते, त्याला त्या गाण्याचं ज्ञान आहे..पण एक अशी व्यक्ती कि ज्याला काही गाता नाही येत, तर काय होणार आहे?? ज्याना गाता येत असेल त्याना नाचता ही छान येत असेल पण नाचणा-या व्यक्तीला गाता येईलच असं नाही..
चिकाटी म्हणजे नक्की काय.. आपण आयुष्यात बरेच प्रयत्न करतो..
पण 'प्रयास' करणे म्हणजे चिकाटी.. प्रयत्न करणे म्हणजे try करणे..पण प्रयास करणे म्हणजे efforts घेत राहणे..

आपलं काही ऊद्दीष्ट आहे..पण त्यासाठी 5 फुटाच्या पाय-या आहेत तर मग आपण त्या सहजपणे चढू शकणार आहोत का?? इथेच आपली गणितं चुकतात..मग इथे आपल्याला आपलं ध्येय नीट पहावं लागतं..मग त्यासाठी लहान लहान पाय-या आपल्याला हव्या असतात..ज्याचा वापर करून आपण आपलं Aim (ध्येय) achieve (प्राप्त) करू शकतो..

उद्दीष्ट = म्हणजे objective.

ह्या उद्दीष्टामधे आपल्याला दोन गोष्टींचा विचार करावा लागतो..
1) अस्तिभाव  (ease ness)..
     Ease (ईझ) म्हणजे विश्रांती, चैन, सहजपणा

म्हणजे 'जसं आहे तसं' ..आधी, माझ्याकडे काय आहे ह्याची जाणीव आपल्याला असायला हवी..आपली capacity (क्षमता) काय, ते आपल्याला पाहिलं पाहिजे..मग क्षमता कमी असेल तर ती आपल्याला वाढवता आली पाहिजे..
एक दिवशी मी 20 कि.मी. चालू शकेन आणि मग दुस-या दिवशी 10 कि.मी. चालू शकेन..कारण तशी आपल्याला सवय नाही..म्हणजे 'अस्तिभाव'..जे आपल्यात नसेल तीच क्षमता आपण जास्तीत जास्त मागत बसतो..पण त्या साठी प्रयास करायला हवेत.
उदाहरण- तुम्हाला जागरण करायचं आहे..एका पुर्ण रात्री झोपलो नाही..मग नंतरच्या रात्री पण नाही झोपलो..आणि मग पुढच्या दिवशी आपला मेंदू काम नीट करेल का?/ आपण म्हणतो मला भीतीने झोप लागत नाही..परिक्षा ही आपल्याला पास करायला घेतली जाते..फेल (नापास) करायला नाही हे लक्षात ठेवा..तुम्ही कधी पाहिली आहे का, नापास झालेल्यांची लिस्ट लावलेली?? नाही..मग प्रत्येकाने आपलं एक तत्व लक्षात ठेवा..
"तुम्ह के प्रेम राम के दूना"..
आपण रामावर करतो, त्यापेक्षा जास्त प्रेम राम आपल्यावर करत असतो..

म्हणजे मी रोज अभ्यास करणार आहे..मग मला देव 35 x 3= 105 मार्क्स देणारआहे..हे लक्षात ठेवा..जो आपल्याला म्हणतो की "मी काही अभ्यास करत नाही" तेंव्हा समजायचं कि हा स्मार्ट आहे..पण मला माझा अभ्यास केलाच पाहिजे..
युनिव्हर्सिटी मधे एक लाख मुलं परिक्षेला बसली असतील तर मग 99 हजार पास होतातच..मग ते आपल्याला पास करायलाच बसले आहेत..काही जण guilt (कमीपणाची भावना) मुळे नापास होतात कि मी अभ्यास केला नाही..आणि 10% विद्यार्थी अभ्यास न केल्यामुळे फेल होतात..
ऊदाहरणार्थ- आपलं पुस्तक 1500 पानी आहे..आणि एका रात्रीत 500 पानं वाचुन होणार नाहीत..ह्यालाच ease ness म्हणतात..

2) वास्तव उद्दीष्ट (objective reasonable)

आपलं उद्दीष्ट (reasonable) योग्य/रास्त असले पाहिजे..आपलं एका दिवसात पुस्तक वाचणं, हे (unreasonable) अयोग्य आहे.. आपलं ध्येय काय? मला मी चांगल्या मार्काने पास होणं..मग माझं उद्दीष्ट काय, तर शाळा, कॉलेजच्या पहिल्याच दिवशी माझा अभ्यासक्रम काय आहे? हे ही माहित पाहिजे..
ऊदाहरण- साधी गोष्ट घ्या..मी ह्या वर्षात साई चरीत्र वाचेन..किंवा ग्रंथ वाचेन..असं माझं उद्दीष्ट असलं पाहिजे..
मग मला हे सर्व कसं जमेल..कि मी नोकरीला जातो/जाते..मग मी किती वेळ देऊ शकतो..त्याला ease ness म्हणतात..
हा ease ness (सहजता, त्रासापासुन मुक्तता) दरवर्षी आपल्याला पाहता आला पाहिजे..ह्या साठी योग्य दिशेने चिकाटीने पुढे जाता आले पाहिजे..

रस्त्यात डोंगर आला..मग त्याला आपण लाथ मारून जाणार का? आपण त्याला वळसा घालून गेलं पाहिजे..मग आपण म्हणू कि मी त्या डोंगराला लाथ मारीन आणि त्यासाठी देवाला बोलवीन..तर देव मुळीच येणार नाही..पण आपण संकटात आहोत तर मग आपल्याला त्या डोंगराच्या पलीकडे घेऊन जायला देव तयार असतो..मग त्यासाठी आपल्याला ease ness कळलं पाहिजे..

जो मनापासुन भगवंतावर प्रेम करतो..त्याला देव स्वत:हून 'अस्तिभावाची' जाणीव करून देतोच देतो..

आपण सायकल शिकताना पडतोच नं..पण मग मी पडीन, ह्या भीतीने सायकलच नाही चालवली तर सायकल कधीच जमणार नाही..त्यालाच ease ness म्हणतात..

जे जसे आहे तसे (accept) स्विकारणे, त्याला दुबळेपणा म्हणतात..आपण, जे आहे ते समजुन घेणे त्याला ease ness म्हणतात..

जेंव्हा आपण ease ness ला efforts (प्रयास) ची जोड देतो तेंव्हा बरंच काही होऊ शकतं..त्याला "such ness" (such म्हणजे= similar, like this,   अशाप्रकारचा, तसला, अमुक, ठराविक) म्हणतात..

He is such a idiot..(तो वेड्यासारखाच आहे) असं आपण म्हणतो..मग "such" चा अर्थ काय?? निव्वळ. एकदा तुम्हाला ease ness समजला तर मग तुम्हाला जसं हवं तसं ते तुम्ही करू शकता..
मग त्यानंतर तुमच्यात जो such ness असतो, तो तुमच्यात येतो..

He is such a good boy...
उदाहरण- माझी आजची क्षमता काय आहे ते त्या व्यक्तीने ease ness ने पाहिली पाहिजे.. आणि मग ती मी हळू हळू वाढवीन..त्यालाच ease ness to such ness म्हणतात..

"Ease ness can be converted into Such ness..."

मग आपल्याला काय बनायचं आहे..त्यासाठी आपल्याला काय परिश्रम केले पाहिजेत..हे जाणून घेणे त्यालाच such ness म्हणतात..आणि हे वास्तव उद्दीष्ट मधे येतं..त्यासाठी आपलं objective, reasonable असलं पाहिजे..

उदाहरणार्थ..एक कावळा तुम्ही घरी आणून त्याला हिरवा रंग लावला आणि त्याच्या चोचीला लाल रंग लावला तर तो पोपट होणार आहे का??

Ease ness स्विकारायला शिका..नुसतं स्विकारू नका..तर त्यात हवे असलेले बदल करून स्विकारा..मग गोष्टी आपोआप घडून येतात..आणि जर ह्याला भगवंताच्या नामाची जोड असेल सर्वच सोप्पं होऊन जातं..मग आपल्याला आपला अस्तिभाव समजुन घेतला पाहिजे..मग मला काय बनायचय म्हणजे such ness येण्यासाठी efforts कसे करायचे हे आपल्याला कळले पाहिजे..

प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे..
I am Unique..(मी अद्वितीय आहे)..म्हणजे माझ्या सारखा मी एकटाच..कारण देवाने आपल्याला बनवलं, कि मग आपला साचा मोडून टाकत असतो..म्हणुन कधीच तुलना करू नका..मग कधीच स्वत:ला तुच्छ लेखू नका..

निव्वळ म्हणजे such ness कसं होता येईल, त्यासाठी काय काय प्रयास करायला लागतील..त्याच्या लहान लहान पाय-या करणे हे आपण ठरवलं पाहिजे..मग तसं नाही केल्याने आपली चिकाटी आपल्याला सोडून जाते..

बापू काही बोलत नाही ह्याचा अर्थ असा नाही कि बापूला काही माहित नाही..असं आपण मनात जरी आणलं तर मग आपण अस्तिभावा पासुन खुप लांब जाऊ..आणि ह्या जन्मात परत आपण तो ease ness कधीच मिळवू शकत नाही..

ह्या वर्षात काय सांगितलं आहे..कि प्रेम वाढवायचं आहे..जी व्यक्ती जवळची आहे तिच्यावर 15% तरी प्रेम वाढवता आलं पाहिजे..एकाला आपण हरि ॐ करतो..पण चेहरा मख्खं..असं का..तोच भाव
चेह-यावर का नसतो??
आपण सकाळी उठल्यावर घरच्याना किती वेळा प्रेमाने गुड मॉर्निंग केलं आहे?? एक गुडमॉर्निंग म्हणुन सुरूवात तरी..अंबज्ञ म्हणा..समोरच्या व्यक्तीने नाही म्हटलं तरी चालेल..आपण म्हटलं पाहिजे..त्याला चिकाटी पाहिजे..मग आपण घरात भांडताना, ती व्यक्ती आपली आहे..असा ease ness असला पाहिजे..कारण तो समोरचा माणूस आपला आहे, हे समजलं पाहिजे..तो माणूस माझा आहे, हे आपण पाहिलं पाहिजे..

एक लक्षात ठेवा, जो श्रध्दावान आहे त्याच्या आजुबाजूची वाईट माणसं आपोआप लांब होतात..घरात होणारी 99% भांडणं मुर्खपणामुळे होतात कारण आपण समोरची व्यक्ती वाईट आहे असं मनात ठेवून भांडतो..तसं नाही.

एका व्यक्तीच्या घरी 6 जणं सतत भांडत असत..मग त्यानी भांडायला लागल्यावर रामनाम वही लिहायला सुरूवात केली..मग आपोआप 6 महिन्यात त्यांची भांडणं बंद झाली..मी भांडून घेऊन मग वही लिहिन..त्याला म्हणतात, objective unreasonable..मग मी भांडता भांडता वही लिहीन..बापूंनी सांगितलय नं..त्याला objective reasonable म्हणतात..

गॉड तुस्सी ग्रेट हो सिनेमात सलमान एकदा देव बनतो..तेंव्हा तो एक दिवसात पुर्ण राडा करून ठेवतो..पण देव रोज शांत असतो..

एक लक्षात ठेवा..माय चण्डिका आणि तिच्या पुत्राचं नाव घेऊन आपण आपलं काम करतो तेंव्हा ते ease ness आपल्याला हवं तेवढं provide (पुरवत) राहतात..पण आपल्याला ते कधीच टाकत नाहीत..
देवाने आपल्याला हे वचन दिलं आहे..

आपण आरती मधे म्हणतो..
जिस जिस पथ पर भक्त साई का,
वहाँ खडा है साई..

तुम्ही जोर काढू लागा..दुधाची वाटी साई घेऊन ऊभाच आहे..

"कृतांताच्या दाढेतुन काढेन निजभक्ता ओढून"
हे बाबांची ग्वाही आहे..पण कधी..जेंव्हा त्याच्या कथेचं वाचन आपण करू तेंव्हा..

आम्ही देवाचं करतो, हे बोलणं चुक आहे..देव आपलं सर्व काही करतो, ते खरं आहे..
मग आज पासुन आपल्याला आपला ease ness समजला पाहिजे..आणि such ness कडे वाटचाल केली पाहिजे..

जर आपल्याला आपलं जीवन, डबकं बनवायचं नसेल तर वाहत राहणे गरजेचं आहे त्यासाठी चिकाटी असली पाहिजे..आणि मग ती वहात जाऊन ती थेट (direct) सागराशी मिळणार आहे..

मग आज पासुन..आपला प्रवास ease ness to such ness सुरू करायचा आहे..

अंबज्ञ
भाषांतर
मिलिंदसिंह फणसे
मी अंबज्ञ आहे
आम्ही अंबज्ञ आहोत..

No comments:

Post a Comment