My Blog List

Friday, January 30, 2015

Pravachan on 29th January 2015

हरि ॐ दिनांक 29/01/2015 प्रवचन

अवघाचि संसार आपण नीट पाहिला..

आता चवथा पॉइंट आहे आपला "चिकाटी"

स्वार्थ मधला चिकाटी हा महत्वाचा गुण आहे आणि जो आपलं जीवन भलं करायला खुप गरजेचा असतो आणि आपल्यातच तो खुप कमी असतो.
एकदा काम करा.. एक पेन व पेपर घेऊन बसुन, "आपण किती काय काय ठरवलं पण चिकाटी नसल्याने केल्या नाहीत", ते पहा.
मग आपल्याकडे ही persistency (चिकाटी) का नसते??
10% माणसांकडे प्रत्येक गोष्टीसाठी चिकाटी नसते.वाईट करायला चिकाटीची गरज नसते..मग चांगलं करताना आपल्याला आपली चिकाटी का वापरता येत नाही.

देवाने प्रत्येकाला चिकाटीचं केंद्र हे दिलेलंच असतं..म्हणुन आपल्याला भुक लागते, तहान लागते.  आणि आपल्या (ब्रेन) मेंदूमधे ते केंद्र असुनही आपण ते नीट वापरत नाही..

समजा आपल्याकडे खुप पैसे आहेत पण जीवाला मारून जगत असाल तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे??

मी एक माणुस पाहिलेला, तो  एका धोतराचे दोन भाग करून ते आपल्या गुडघ्यापर्यंतच बांधायचा आणि एकच बंडी वापरायचा..सकाळी लवकर ऊठायचे, झाडाखाली असलेल्या काठ्या गोळा करून बंबात पाणी गरम करायचा, भातही बनवायचा. बाकीचे जेवण स्टोव्हवर करायचा.. पाहिल्यावर वाटायचं कि हा माणुस गरीब असेल. पण मुंबईत त्याच्या मालकीच्या 18 चाळी होत्या, 10-12 दुकानं होती. आणि तीन दुकानं ह्याची मुलंच चालवत होती. सगळा पैसा त्याच्याकडेच यायचा. दोन सुना शिक्षिका होत्या, त्यांचाही पगार याच्याकडेच! त्याना 20-20 मिनीटे चालत जावं लागायचं.. जेंव्हा ते वारले तेंव्हा त्यांच्या जवळचे कोणीच नव्हते. त्यांच्या धोतराच्या कनवटीतुन 100 च्या 30 नोटा मिळाल्या.. पलंगावरच्या गादी खाली दिड लाख मिळाले. कपाटात बरेच सोने अन् दागदागिने मिळाले.. आयुष्यभर सगळं असुन पण वापरलं नाही..
असे तुम्ही पण सगळे कवडी-चुंबक आहात.. आणि आपण कशासाठी कंजुस  आहोत? तर चिकाटी वापरायला..

आपण एरवी चिकाटी वापरतो पण जेवताना, काम करताना.. पण अशी ही चिकाटी प्राण्यासारखी असते. आपल्याला प्रत्येकाला 100% चिकाटी ही आहेच आहे.. हे सगळं मॅनेज करण्याचं केन्द्र आहे, मेन्दुमधे, ते म्हणजे 'चिकाटी'..
जोपर्यंत आपला श्वास चालू आहे म्हणजे आपल्याकडे चिकाटी ही आहेच.. मग बापू आम्ही चिकाटी का वापरत नाही? पण चिकाटी न  वापरण्याच्या फायद्याचे आपण व्यसनी झालेलो असतो.

चिकाटी न वापरल्याचा फायदा काय तर चिकाटीसाठी आपल्याला एकच पर्याय धरुन ठेवावा लागतो आणि ते आपल्याला कधीच नको असतं. तेंव्हा आपल्याला (freedom) स्वातंत्र्य मिळत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं कि चिकाटी नाही वापरली तर आपल्याला मिळणारं स्वातंत्र्य कमी होतं, असं मनाला वाटत असतं..

भाग मिल्खा मधे एकदा तो पडतो आणि तेंव्हा त्याचा गुरू त्याला 'उठ' असं ओरडतो.. आणि त्याला जे 'हवं' ते करायला लावतो.. त्याला तो एका ऊद्दीष्टाला धरुन ठेवायला सांगतो.

पण मला पाहिजे तसं मला वागता आलं पाहिजे, हे आपल्याला हवं असतं.. चिकाटी न वापरण्यामागे माणसाचा स्वत:चा चुकीचा फायदा असतो.

अतिशय महत्वाचं वाक्यं-
"जे लोक यशस्वी होतात, ते चिकाटी ने यशस्वी होतात..तेंव्हा ते समोर एक (main goal) मुख्य ध्येय ठेवतात आणि बाकी (sub-goals) ऊप-ध्येय ठेवतात. मग जीवनाच्या कोणत्याही अडचणीपेक्षा आपलं (goal) ध्येय, ते मोठं आहे असं सांगतात आणि मग ते चिकाटीचं केन्द्र (automatic) आपोआप काम करू लागतं"..

आपल्याला आपलं ध्येय ठरवता आलं पाहिजे. मग आपलं चिकाटीचं केंद्र काम करायला लागेल. चिकाटी आपण वापरत नाही आहोत. जीवनाचं ध्येय (goal) हे मोठंच असलं पाहिजे असं नाही..साधं असेल तरीही आपलं जीवन हेच मोठं ध्येय असतं..

एका सरकारी ऑफिसमधल्या शिपायाला पॅरिसला जायचं होतं, एक म्युझियम पहायला! तर त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. पण त्याने त्याचा पगार हा घरासाठी वापरला आणि ट्रेनमधे पेनं वगैरे विकून त्याने तेवढे पैसे जमवले. त्याने गोळा केलेले त्या पॅरिसचे फोटो, माहिती एका फ्रान्सच्या माणसाने पाहिलं. त्या फ्रान्सच्या माणसाच्या पत्नीला एका प्रोजेक्टसाठी जी माहिती हवी होती, ती सहजच मिळाली आणि त्यावर खुश होऊन त्या शिपायाचा जाण्या-येण्याचा तिकीट खर्च आणि 6 महिने रहायची सोय ह्या फ्रान्सच्या माणसाने केली..इथे त्याची चिकाटी कामाला आली.. आणि त्याची जाण्याची वेळ जेंव्हा आली, तेंव्हा त्याच्या मुलीचं लग्न ठरलं.. पण त्याने त्याच्या मुलीला समजवलं आणि तिनेही सर्व मान्य केलं..आणि मग ज्या आजीसाठी लग्न लवकर करायचं होतं, ती आजी वारली.. आणि तो फ्रान्सवरून आल्यावर त्याच्या मुलीचं लग्न ही नीट झालं.. ह्याला म्हणतात चिकाटी.. "देव कधीच कोणाची परिक्षा बघत नाही" हे ह्यातुन आपल्याला समजतं..

आपल्या गरजे मधे आणि ध्येय यामधे फरक आहे.. आपण विचार केला पाहिजे की आपलं ध्येय काय आहे.. आपण माकडा सारखं जीवन जगत आहोत. आपण एकदा या फांदीवर तर ऊद्या दुसरी..

एक श्रध्दावान बाई आहे, आणि तिचं ध्येय होतं कि तिला मरण्याच्या आधी 324 वेळा साईसच्चरिताचे सप्ताह करायचे होते. तिने तिची सर्व कामं सांभाळुन 324 सप्ताह केले. त्या स्त्रीने वयाच्या 34 व्या वर्षी केलेला निर्णय तिने हल्लीच तीन महिन्यापुर्वी  वयाच्या 81 व्या वर्षी तिचे सप्ताह पुर्ण केले.. आणि हे सर्व तिने घरातलं सर्व सांभाळुन केलं.. दोन सुना वेगळ्या राहिल्या.. म्हणत असे, बाबांची इच्छा.. कारण तिचे ध्येय काय ते तिने पुर्ण केले..
सर्व सप्ताह पुर्ण केल्यावर गुरूक्षेत्रमला ती स्त्री आणि तिचा पती आले.. दादांना ती पोथी हात लावायला दिली आणि मग मला (बापूंना) ही दिली.. मग अचानक मोठी सुन आली, लहान मुलाला नीट सांभाळण्यासाठी येऊन एकत्र राहू लागली.. तिच्या पुर्ण झालेल्या ध्येयानंतर तिचं काहीच ध्येय नव्हतं..

"ध्येय हे असं असलं पाहिजे कि ते ध्रुवपद असलं पाहिजे जे कोणीच बदलू शकत नाही".
कारण त्या स्त्रीच्या चेह-यावरचा आनंद पाहिला आहे..
माझ्या संपुर्ण मनाला कायमचं सुख देईल त्याला ध्येय असं म्हणतात.. त्या साठी आपण असं पारायण केलं पाहिजे असं नाही. पण जीवनात चिकाटी ही असलीच पाहिजे..

ध्येय पुर्ण करण्यासाठी चिकाटी असलीच पाहिजे.. आणि त्या ध्येयासाठी दुसरी गोष्ट आपल्याला तुच्छ वाटली पाहिजे.. कारण त्या ध्येयासाठी इतर वस्तू सोडती आल्या पाहिजेत..

"ध्येय आलं कि चिकाटी येते"..

एखादी चुकीची गोष्ट सतत करणे म्हणजे चिकाटी येत नाही.. आपण जेंव्हा टाईमपास करायला लागतो तेंव्हा समजा कि आपलं काहीच ध्येय नाही..

आपण म्हणतो की आपले कोणी नातेवाईक नाही, मित्र नाही! असं न म्हणता आपलं ध्येय हेच आपला मित्र बनू शकते..

"आपलं ध्येय हे स्वावलंबी च असायला पाहिजे"..

परावलंबी जीवन कधीच कामाला येत नाही.. मग आपण स्वावलंबी असण्यासाठी आपलं ध्येयपण तसंच स्वावलंबीच असायला हवं..

कोणाकडून मान मिळेल म्हणुन काहीही करू नका..मी कोणाचं चांगलं करतोय असं मनात सतत ठेवलं तर माणसं तुमच्या रस्त्यात अजुन काही आणुन टाकतील..पण त्यासाठी आपण का अडायला हवं??? आपण आपल्या ध्येयासाठी पुढे जायचंच आहे..
आपलं ध्येय लहानच असेल तर काय झालं..मग 'मी ग्रेट आहे' असं म्हणायला काहीही हरकत नाही.. त्या पुढे अंबज्ञ म्हणाल अजुनच छान आहे..अशी लहान लहान ध्येय ध्येय मिळाल्यावर आनंद करा..

काहीतरी आपल्या जीवनाला एक बळकट ध्येय असू द्या..आणि ते ही त्या मुख्य ध्येयाच्या विरुध्द असता कामा नये.. प्रमुख ध्येयाला सुसंगत अशी बाकीची (sub) उप ध्येय असायला हवीत..

आज जर आपलं वय 80 असेल तरी काही नाही. अजुन पण आपण ध्येय ठरवुन आपलं भलं-मोठं काही तरी करू शकता..

आम्हीही काळाच्या बरोबर असलं पाहिजे.. आणि त्यात लहान लहान गरजा येतातच..पण त्या ध्येयाच्या मधे काही येऊ देऊ नका..
एकदा ध्येय ठरलं कि बाकीच्या गोष्टींवर मात आपण करू शकतो.. मग आपल्याकडे ध्येय आहे का? नसेल तर आपल्याला ध्येय देणारा लागतो..

1 जानेवारी 2012 च्या दिवशी मी, "एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरू ऐसा" हे ध्येय दिलं.. ह्या वर्षात 'प्रेमाचं' ध्येय आहे. आपल्याला कोणी प्रेम दिलं पाहिजे असं मुळीच नाही.. पण आम्ही बापूंचं प्रवचन ऐकुन त्यातुन आपलं ध्येय आपण ठरवुन पुढे चालुया.

गावा मधे असलेल्या लोकांमधे लहान ध्येय असतात. कि या वर्षी वारी ला जायचंच. मग तेंव्हा मुलगी किंवा सुन आजारी असली तरीही ती लोकं, वारीला जातातच.. आणि मग त्यातच त्याना मिळणारा आनंदही मिळतोत..

आपल्या कडे चिकाटी पाहिजे आणि ध्येय पाहिजे.. मग भगवंत आपली काळजी घ्यायला तयार आहेच.मग आपल्या प्रत्येक (heart-beat) हृदयाच्या ठोक्याबरोबर ही चिकाटी आपल्या जीवनात उतरत असेल..

साई चरित्रात बाबा म्हणतात नं,
तुम्ही जोर मारू लागा..
दुधाची काळजी सर्वत्र त्यागा..

मी मागे वाटी घेऊन ऊभा आहे.. पण तुम्ही म्हणाल कि आम्ही बसू आणि साई तू जोर मार, तर तसं चालणार नाही..

"जन्म माझा व्यर्थ ना हो..
मृत्यू लागो सार्थकी"..

जीवन हे व्यर्थ आहे जेंव्हा ध्येय नसेल..

संसार सुखी करायचा असेल आपल्याला आपल्यात चिकाटी आणली पाहिजे.. आणि ती चिकाटी असेल तर आपल्याला अख्ख जग जिंकता येईल..
त्यासाठी
"एक विश्वास असावा पुरता".. ..आपण त्या साठी जोर काढले पाहिजेत..

ह्या वर्षात आपण प्रेम करायला शिकणार आहोत पण त्या बरोबरच आपल्याला आपलं ध्येय असलं पाहिजे.. आणि आपली नजर आपल्या ध्येयावर ठेवा..
आणि मग..

बनता बनता बनेल.. म्हणजे असं काही घडेल जे आपल्यासाठी 'सर्वोच्च' असेल हे नक्की..

No comments:

Post a Comment