My Blog List

Thursday, January 22, 2015

Pravachan on 22nd January

हरि ॐ  गुरूवार  दिनांक 22/1/2015 प्रवचन

अवघाचि संसार सुखाचा करीन..त्यात आपण संवाद पाहिला..आता त्यातही एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे आपल्या आजुबाजूला बरेच लोक आहेत..
आपण आपल्या स्वत:ला एक प्रश्न विचारला पाहिजे कि आपण आपल्या समोरच्याला प्रत्येक गोष्ट सगळी सांगतो का? आपल्या मनात 99.99% हा विचार येतोच..पण आपण अपेक्षा करतो की समोरच्याने आपल्याला सगळं सांगितलं पाहिजे. आणि ह्या अपेक्षे मधुनच 99% प्रॉब्लेम होतात..परमेश्वराने दिलेल्या कर्मस्वातंत्र्याचा आपण प्रत्येकाने मान राखला पाहिजे..प्रत्येकजण 100 खरं सांगतच नाही. मी मानवाच्या पायाला तेंव्हाच हात लावतो, जेंव्हा त्या माणसाचा ह्या जगातला प्रवास संपतो..  आपण मनातील प्रत्येक गोष्ट दुस-याला सांगू नाही शकत..पण आपल्याला मनात असतं कि त्याने सगळं आपल्याला सांगावं..
पण त्या प्रत्येकाच्या वागण्यामागे, काहीतरी कारण असू शकतेच नं..पण मग आपण त्या गोष्टीला महत्व देतो..आणि ज्याला महत्व द्यायचे आहे, त्या गोष्टीला आपण तेंव्हा महत्व देऊ शकत नाही..ज्याचा विचार करायचा असतो, त्यासाठी आपल्याला आपला वेळच पुरत नाही..
उदाहरणार्थ- एखाद्या वेळी एका व्यक्तीने स्माईल नाही दिले, तर त्याचा विचार करत बसू नये..

आपला जसा मुड आहे, तसाच मुड समोरच्याचा ही असेलच असं नाहीये..
दोन महिन्याच्या लहान मुलाला ही त्याचे मुड असतात, तर मोठ्या माणसाला ही मुड असुच शकतात..

एक सांगतो..नवरा चक्रम असेल किंवा बायको भांडखोर आहे..पण ते चांगले असतील..तर समोर भांडण होत असेल तर आपण गप्प बसावं..असं एकदा करून बघा..आपण response (प्रतिसाद) द्यायचाच नाही..भांडून कधीच प्रश्न सुटतच नाही..म्हणून एकाने तरी शांत रहावे..जर आपली भांडखोर माणसाशी भेट झाली, तर जर त्याने चालु केले तर आपण शांत राहायचं..म्हणजे त्या माणसाला भांडण्याचे मुद्देच मिळत नाहीत आणि मग तो माणुस स्वत:च गप्प होतो..

चक्रम म्हणजे विक्षिप्तपणा! म्हणजे हवे तसे वागून समोरच्याचा विचार न करणे..अशा माणसाचा विचारच न करणे..अशा वेळी ती व्यक्ती आली, तर दहा हात लांब रहायचं..पण जर ती व्यक्ती नेहमीच्या वेळची आहे, तर जास्त न बोलता त्याला इतर कामामध्ये बिझी ठेवायचं..आणि त्या व्यक्तीशी बोलायचं असेलच तर आपला आणि त्याचा संबंध येत नाही अशा इतर गोष्टीचा विषय काढायचा..म्हणजे अमेरिकेचे राजकारण..

पण अशा व्यक्तीचा जर आपल्या घराशी संबंध येत असेल तर आपल्याला जे छान वाटतं ते करून त्याला सांगायचं की मला आवडतं, मी केलं..तुला नाही आवडत तर असू दे..असं बोलून शांत रहायचं..

घरामधे जास्त 'मौन' ची भाषा चालू असते..
1) ह्या व्यक्तीला कमी बोलायला आवडतं.
2) हा माणुस बाहेर बोलतो पण घरी नाही
3) पण हा माणुस कधीच जास्त बोलत नाही, मग
     त्यावेळी त्या व्यक्तीला काय आवडतं, त्यावर
     बोलायला शिका..

मुलं बोलत नाही..ते पालकांशी बोलायला घाबरतात. पण तेंव्हा आपल्याला त्यांना बोलतं करायला प्रयास करावे लागतात..आणि मग जर तरीही ते नाही बोलले, मग देवाला सांगायचं की "देवा माझे प्रयास थकले..आता पुढचं बघ तुच..

ज्या व्यक्तीला बोलतं करायचं आहे त्या व्यक्ती समोर त्याला आवडणा-या गोष्टींवरून एक-दोन वाक्य बोला..म्हणजे त्या व्यक्तीला एक न एक तरी वाक्य बोलावं लागतंच..
जर एखाद्याला भावना व्यक्त करता येत नसतील..तर आपण कसं ओळखायचं?

ती जी कोणती व्यक्ती आहे त्याच्या मनात जे चालू आहे ते आपल्याला, त्याला समजुन घ्यावं लागतं..मग ते फक्त एकाच माणसाने करायचे असं नाही..पण त्यासाठी ही एक limit (मर्यादा) असते..कारण आपल्या future ( भवितव्या)साठी..

प्रयास कुठवर करायचे आणि किती करायचे..असा कठोर निर्णय घ्यावाच लागतो..कारण शेवटी प्रत्येकाचे आयुष्य हे स्वतंत्र आहेच..जीवनातले प्रत्येक प्रश्न आपल्याला स्वत:चे स्वत: सोडवायचे असतात..

गाडीचा अपघात होताना जर दहा जण मृत झाले, तर ते एकाच वेळी मरत नाहीत..मृत्यू लोकात येण्यासाठी आणि जाण्यासाठी प्रत्येक जण एकत्र येऊ किंवा जाऊ शकत नाही..

"घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी हे त्यानीच प्यायला पाहिजे.."

माझ्या जीवनात सगळे जण आहेत..तरी मी हा एकटाच आहे..आणि माझ्या बरोबर माझा तो परमात्मा आणि त्याची आई..म्हणजे मी एकटा कधीच नाही..तर आम्ही तिघे आहोत..इतर जण आपल्या बरोबर आहेत पण त्याची खात्री नसते..पण परमात्मा आणि त्याची आई माझ्या बरोबर असतेच असते..

आपल्याला कल्पनाच येत नाही की काल पर्यंत आपल्याशी बोलणारी व्यक्ती आज बोलत नाही..हे ज्याला त्याला दिलेलं कर्म-स्वातंत्र्य आहे ज्याचा तो वापर करत असतो..म्हणुन आपण पण तसा विचार आपल्यासाठी केला पाहिजे..

माझी स्वत:ची अपेक्षा काय आहे..एक 'बाप, आई, नवरा म्हणुन माझी अपेक्षा काय आहे? हे बघा, हल्ली मुली, मुलगा वेगळा असेल तरच लग्न करणार..का? आज 27 वयापर्यंत त्या मुलाला, तु (वधू मुली ने) वाढवलेस का? नाहीच!
चांगले भक्त इतरांसाठी compromise (तडजोडी) करतात..आणि नंतर मग काही वर्षांनी त्याची जाणीव होते..असं करू नका..

मला माझ्या जीवनात नक्की हवे काय? हे मला माहीत पाहिजे..एकदा एक माणूस येतो, त्याला एका कंपनीत चांगला जॉब आहे..आणि दुसरीकडे 5000 जास्त मिळणार म्हणून नवीन जॉईन केला..पण नवीन जॉब वरून काही महिन्यातच काढून टाकतात..आपण लहान गोष्टीसाठी एवढा विचार केला..म्हणजे 5000/- जास्त मिळणार म्हणून...

समोरच्याने आपली काहीच चुक नसताना आपला अपमान केला आणि मग तेंव्हा आपल्याला त्या माणसाला विचारता आलं पाहिजे की माझी काय चुक आणि तु मला असं काय बोलू शकतो?? असं विचारता आलं पाहिजे..

एकत्र कुटूंब हे विभक्त कुटूंबापेक्षा नेहमीच चांगलं!

Ego (मी पणा) आणि self respect (स्वाभिमान) ह्यात फरक आहे..कोणी आपला self-respect (स्वाभिमान) ठेचत असेल तर त्या माणसापासुन लांब रहा..पण आपण तसे वागतो का? हा विचार ही करायला हवा..आणि तसे आपण वागत नसू तर समोरच्या व्यक्तीचं काहीच मनाला लावून न घेता पुढे चालत राहिलं पाहिजे..आणि मग तो अत्याचार सहन करू नका..

"स्वत:चं स्वत्व गमावुन बसू नका"

काही लग्नं नुसत्या संसारासाठी टिकुन आहेत..भरपुर try (प्रयास) करुन पण लग्न टिकत नसेल..तर तोडा नं..खोटी नाती ठेवुन काहीच ऊपयोग नाही..जर एका बहिणीला 100 भाऊ आहेत पण त्याना बहिणीची पडलेलीच नसेल, तर काही गरज नाहीच..एक भाऊ आहे आणि त्याला बहिणीची काळजी असते त्याला जपा..

आम्हाला बापू किती वेळा आठवतात हे ही मी बघतो...माझ्याकडे काही तरी नक्कीच सिस्टीम्स आहेत..माझ्याकडे दैवी शक्ती नाही..पण माझ्याकडे खुप गुप्तहेर आहेत. जगाची लोकसंख्या किती आहे, तेवढे गुप्तहेर आहेत..मग मला कळतं की मला (बापूना) हाका मारतात..

एकदा स्वत:ला बदला..पण असेही बदलू नका की आपण स्वत:लाच ओळखु शकणार नाही..अशासाठी बदला, पण ज्याची किंमत समोरच्याला नाही, तर काय बदललात?

माझ्याकडून एक चुक झाली, तर झाली नं, पण तो माझ्या फोटोसमोर ऊभा राहून रोज सांगतो! एक वेळी मला कंटाळा येतो..एकदा सांगितल्यावर मला (बापूंना) कळतं! माझ्याशी कपट करू नका..कारण मी (बापू) जगातला मोठा कपटी माणूस आहे..मी जराही मुर्ख नाही..जर मुर्ख असतो तर आजपर्यंत टिकलो नसतो..मला कोणी काहीही करू शकत नाही..मी कोणाच्या बापाला घाबरत नाही..गेले वर्षभर मी ज्याच्यासाठी लढतोय त्यानी मला काहीच कमी केलं नाही..मला 'त्याच्या' कडून काहीच नकोय..कारण मी त्यांच्या विरोधात काम करणारच आहे..
तुम्ही सतत ती चुक सांगत बसतो! का असं? त्याला एकदा सांगितल्यावर कळतं सगळं..

"भारतामध्ये कोणाला ही धर्मबाह्य होण्याची भीती नाही वाटत पण जाती बाह्य होण्याची भीती वाटते"

मनात येतं कि माझे गाववाले काय म्हणतील, आणि जातवाले काय म्हणतील..आपण काय करावं..कुठे जायचं, हे आपण न ठरवता इतर लोक का ठरवतात?? बंधनं असली पाहिजेत..पण त्या बंधनांची बेडी झाली नाही पाहिजे..
तुम्हाला कधी पैशाची गरज पडली, तर गाववाले वर्गणी काढून आपल्याला देतात का? नाहीच नं? मग हे सर्व आपण म्हणतो कि आपले गाववाले आहेत, कारण ते आपला आधार आहेत..पण ते खोटे आधार आहेत..खरा आधार एकच.."तो परमात्मा आणि ती आजी"..

लोक काय म्हणतील हा विचार करायचा सोडून द्या..कारण गरज पडल्यावर कोणीच नाही येत..येतात ते फक्त आपली आजी आणि परमात्मा..

सगळी माणसं वाईट आहेत असं नाही पण स्वत:साठी सुध्दा जगायला शिका..कोणत्याही गोष्टीने कर्मठ बनू नका..टोकाची शिस्त पाळून काही नाही होत..पावित्र्य हे प्रमाण ठेवुनच आपल्या आजुबाजूचे नियम मोडावे लागतात..पण ते नियम मोडताना इतरांना त्रास नाही ना होत, हे बघा...

देवाने कोणतेच नियम लावले नाहीक..पण माणसाने माणसाला लावले आहेत..बेलगाम पणे वागू नका..आपला लगाम/वेसण दुस-याच्या हातात का?? आपल्या गळ्यात कोणाची वेसण असता कामा नये..प्रेम असताना पण कर्तव्य असल्यावरच केलं पाहिजे..पण सतत नाही..आपल्याला हा निर्णय हा घ्यावा लागतोच..मग शेवटी देवाला सांगावं लागतं कि, देवा हे डोक्यावरचं वजन कमी कर..पण आपणच ते वजन आपल्या डोक्यावर घेतलेलं असतं..

तुम्ही सगळी चांगली माणसं आहात पण मग आपण आपल्या वजनापेक्षा जास्त वजन डोक्यावर घेऊन फिरत असतो..स्वार्थ शिकून स्वत्व जपा..
आपल्याला आपला विचार करून आपली प्रगती करणे गरजेचे आहे..प्रगती म्हणजे, पैसा नाही; तर मला मिळणारा आनंद, आपले काम चांगले होणे..

आपल्यावर आपल्या जबाबदा-या आहेतच पण त्या ही किती घ्याव्या ते आपल्याला कळले पाहिजे..कधीही कोणाचं चांगलं केलंत तर ते बोलून दाखवू नका..मग आपलं पुण्य झिरो होतं आणि तेंव्हा आपल्यातलं प्रेम गेलं आणि ते नातं प्रेमाचं न ऊरता ऊपकाराचं नातं होतं..म्हणजे "दे दाता" असं भिकारी चं नातं बनतं..
मग तेंव्हा समोरच्या माणसाला आपल्याशी जवळीक तयार होत नाही..
आई वडिल आपल्या मुलांसाठी करतात त्याला त्याग नाही म्हणत..पण मुलाना ते बोलून दाखवणे चुक आहे! पण मुलांनीही हा विचार केला पाहिजे की आई वडिलांवर ही वेळ का आली, सांगायची?

अवघाचि संसार मधे एक लक्षात ठेवा..कि लाचार होऊ नका. जरी त्यातुन मोठा फायदा होणार असेल तरी तो कमी दर्जाचा आहे..जो पर्यंत देहात श्वास आहे तोपर्यंक लाचार होऊ नका..बापू सगळे दरवाजे बंद झाले..पण असे नाही होत!

हरि अनंत.हरि द्वार अनंत...

हरि अनंत आहे आणि त्याचे दरवाजे ही अनंत आहेत.. स्वत: लाचार होऊ नका आणि इतरांना ही लाचार करू नका..आई वडिलांना सॉरी किंवा थँक्स बोलू नये..तर "आय लव्ह यू" म्हणा..दोन्ही वेळा..

लाचार कोण असतं, तर प्राणी योनी..जो चोच देतो तो दाणा ही देतो..त्याची कृपा आपल्यावर आहेच..तो मार्ग दाखवणारच आहे..देवा पुढे कधी लाचार होऊ नये..बापासमोर लाचार होताना देवाला किती वाईट वाटत असेल हा विचार करा..जे हवं ते हक्काने मागा..बिंधास्त बोला..
फोटो मधे जरी तो असला तरी आपल्या दुख:मुळे तो अजुन दुख्खी असतो आणि आपल्या आनंदामुळे तो चार पट जास्त आनंदी असतो..आम्ही कोणावर अन्याय करणार नाही..माझ्यावरचा अन्याय सहन करणार नाही..माझा देव माझ्या पाठीशी आहे.

No comments:

Post a Comment