My Blog List

Saturday, January 3, 2015

Parvachan dated 01/01/2015 ..How to pray

दिनांक 01/01/2015 चे प्रवचन
हरि ॐ....श्रीराम.. अंबज्ञ..

मी अंबज्ञ आहे. आम्ही अंबज्ञ आहोत..

I am Ambadnya.. we are Ambadnya......

आजपासुन सुरू होणारं नवीन वर्ष प्रत्येक श्रध्दावानाला अधिक चांगल्या, मंगलमय आणि सुखद वातावरणाकडे, पायरीकडे, दिशेकडे घेऊन जाईल हे नक्की.. आज संवाद आपण शेवटी करणार आहोत..
आपल्या वेदामधे, ऋग्वेद, आयुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. तर हे चार वेद आहेत. ह्या चार वेदांच्या छायेने भारत बहरला..

अहं ब्रम्हसी असो कि ईतर असो.

हे मानवा तुझ्यामधे त्या परमात्म्याचा अंश आहे..त्याचा विस्तार जेंव्हा तु करशील त्याच्या दहा पटीने विस्तार तो परमात्मा करत राहील..
प्रत्येक मानव मग तो पापी किंवा पुण्यवान असेल तरीही तो प्रत्येकजण परमात्म्याच्या एका अंशापासुन बनलेला असतो.

आपला एक फोटो म्हणजे काय असतं, आपणच आपलं प्रतिबिंब पहात असतो. आपण जे काही पहातो, पण प्रत्येकाची गती वेगळी असली तरीही आपल्याला शेवटी परमात्म्याच्या चरणी जायचे आहे

परमात्म्याचे चरण हे आपले 'नेटीव्ह प्लेस' (मुळ गाव) आहे..आपण प्रत्येक जण आपलं गाव नाही विसरत! तसच आपलं मुळ गाव म्हणजे 'परमात्म्याचे चरण'..
गावची 300 एकर जागा आपण वापरलीच नाही, तर ती फुकट जाणार..पण हे चरण आपल्याला या जन्मात 'देणारा स्रोत' आहे..आणि तो जरी भर्गलोकात असेल तरीही आपल्याला त्याचा फायदा आहे..पण कधी..? तुमचा भाव कसा आहे, तेंव्हा..
प्रेम किती ते मोजायचे नसते..एक वेळ प्रेम असतं किंवा नसतं..

आम्हाला त्या चण्डिकेवर आणि तिच्या पुत्रावर ही प्रेम वाढवलं पाहीजे..त्यासाठी कोणत्याही ग्रंथाची गरज नाही, कारण तो स्वत: प्रेम स्वरूप आहे..

गेल्या वेळी आपण पाहिलं की 123 म्हणजे अंबज्ञ. पण हा त्रिविक्रम कसा आहे.. जेंव्हा हा त्रिमुर्ती रूप असतो तेंव्हा मधे शिव आणि मारूती, वर रामाचे मुख..त्याचे मुख्य स्थान कोणते, तर मणीद्विप..

हा त्रिविक्रम आहे मुळ वेदांच्या संहितेतुन आपल्या समोर वेदवाक्य म्हणत असतो.

ऊदाहरण-
1) अहं ब्रम्हसी..मी स्वत: ब्रम्हं आहे.

आपल्याला काळाची, समयाची मर्यादा आहे पण त्रिविक्रमाला काळाची मर्यादा नाही..मग आपल्याला कसं कळणार? तर तु म्हणजे 'त्रिविक्रम ब्रम्ह आहे..पण अशासाठी ग्रंथ वाचले तरी आपल्याला काहीच कळणार नाही..

ख्रिश्चन भक्ताला देव दिसतो..तेंव्हा..

एकदा देवाला तो भक्त विचारतो, "मी लोकांना काय सांगू कि तुझं नाव काय???
तेंव्हा देव (गॉडफादर) त्याला म्हणतो, त्यांना सांग कि "मी आहे, म्हणजे 'मी आहे".

ऊदाहरण- मी डान्स करतो

गॉडफादर ने जे सांगितलं, तेच आपल्या वेदांमधेही आहेच..
त्रिविक्रम सांगतोच कि 'मी आहेच'  भुतकाळातही होतो आणि वर्तमान आणि भविष्यामधेही आहेच..
मी अमुक अमुक आहे असं देवासमोर बोलताना काही काळजी घेतली पाहिजे..
ऊदाहरण- मी कुरूप आहे..माझे केस पांढरेच आहेत..मी बारीक आहे..

'मी आहे' हे त्रिविक्रमाचे नाव आहे. मग जेंव्हा आपण वरील काही वाक्य म्हणू, तेंव्हा तर तो त्रिविक्रम हा आपल्यासाठी 'आहे तसंच घेऊन येणार आहे'..आणि म्हणुन तोच सांगू शकतो कि "मी (त्रिविक्रम) तुझ्या पुढे मागे आहेच..
'मी आहे' हेच त्या त्रिविक्रमाचे नाव आहे म्हणून आपण त्याचं नाव घेताना असंच घेऊ नका..

आरशासमोर ऊभे राहून आपल्यात काय चांगलं आहे ते पहा..मनाच्या आरशासमोर ऊभे रहा आणि बोला..
मी सुंदर आहे..पण मग म्हणाल कि मी काळा आहे. अरे पण तुम्हाला काळा बापू चालतो, तर मग तुम्हाला तुमचा रंग आवडत का नाही?

रोज आरशासमोर त्रिविक्रमाचं स्मरण करून आपण बोलू कि "मी आहे तसा छान आहे".. असं म्हणाल तेंव्हा आपल्यातला बदल नक्कीच घडून येईल..तेंव्हा तुमच्याकडे सुंदरता खेचली जाणार.. पण जर आपण गरीब आहोत असं म्हणू तर मग आपल्याकडे गरीबी येणार आहे..

देवळात जाताना याचक म्हणून जरी गेलात तरी आपल्या बापाकडे मागतोय असा भाव मनात ठेवुन नक्की जाल तेंव्हा आपण भिकारी नसणार आहोत..

'मी आहे' हे नाव त्याचं आहे, त्यालाच 'I am' असं म्हणलं गेलं आहे.. हिन्दीमधे 'मै हूँ' असं नाव आहे..

ईलेक्ट्रिसिटी (वीज) आहे ती घेऊन जर लँम्प ला लावली तर तो दिवा जळतो. तसंच ते सामर्थ्य आहे. त्रिविक्रमावर तुमचं प्रेम असेल, तर 'तो' आपले शब्द बदलतो..त्या त्रिविक्रमाला आणि चण्डिकेला ही आपलं 25% कर्मस्वातंत्र्य घेता येत नाही, मग 75% तरी त्याच्याकडे जाऊ दे..

मागच्या वेळी आपण 4 स्टेजेस (पायरी) पाहिल्या..त्या सर्व स्टेजसाठी 'I am' हे नक्कीच कामाला येतं.

मग श्रध्दाहीनांसाठी तो जराही मदत नाही करत..पण श्रध्दावानांसाठी त्रिविक्रम हा 25% मदत करायला येतोच..

आजारी असताना 'आपण आजारी आहोत' असं म्हणायचं नाही..लहानपणी भुक लागल्यावर आईने जेवण दिल्यावर ते मुल खेळायला मोकळं! मग त्रिविक्रमाकडे कसं बोलायचं??

'आई मी "सध्ध्या" आजारी आहे..पण मी लवकर बरा होणार आहे..असं बोलायला शिका..चण्डिकेचा अत्युत्तम आविष्कार म्हणजे तिचा पुत्र त्रिविक्रम..

आपण असं म्हणतो..कि मी नालायक आहे..मग नालायकपणा आपल्याकडे खेचला जाणार आहे..

     "जे जे पिंडी ते ते ब्रम्हांडी.."
     "जे जे ब्रम्हांडी ते ते पिंडी"

आज आपण एक शिकलो, 'मी आहे' हेच त्या त्रिविक्रमाचे नाव आहे.. मी आहे हे शब्द खुप महत्वाचे आहेत..मग आपल्याला या वर्षात हे शिकलं पाहिजे..कि आपण आपले शब्द कसे वापरणार आहोत..

'क्रोध' हे असे विष आहे जे दुस-यावर फेकलं जातं आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होऊन आपलाच संताप वाढत जातो..
असं म्हणा, कि मला राग येतो पण असं म्हणा कि "मी लवकर शांत होतो..

जो गुण तुमच्यात हवा आहे तो त्याच्यासमोर बोलायला शिका..तुमच्यासमोर देव ऊभा आहे आणि मग म्हणा कि "देवा तुझ्यापेक्षा मी कमी शांत आहे..मला हळू हळू शांत कर..तु खुपच शांत आहेस..मी तुझ्यापेक्षा कमी ताकदीचा आहे..मग मला अजुन ताकदवान कर"..पुजा करताना 'स्तुती प्रार्थना' का करतो, कारण तेंव्हा मग आपण त्याचा अंश असल्याने आपण ही तेवढं समर्थ होतो..
ऊदाहरण- देवा तु प्रेमळ आहेस मग तेवढं आपण ही प्रेमळ होत असतो, आणि ते ही (via) परमात्म्याकडून, माय चण्डिकेकडून..

आपल्याला जे काय मागायचे आहे ती 'स्तुती प्रार्थना' असली पाहिजे..

*दुर्गे दुर्घट भारी तुज वीण संसारी..

ही दुर्गा कशी आहे, जे 'दु' म्हणजे वाईट आहे, त्याला नाश करते. अशी ही दुर्गा आहे..ते वाक्य खुप 'लाडकं' आहे..
त्यात तो काय म्हणतो, अनाथ नाते अंबे करूणा विस्तारी..

आई मी तुझ्यापासुन लांब आहे, मी कसा तिकडे येऊ? तु करूणेचा विस्तार कर..म्हणजे मलाही त्या लांब ऊभा असलेल्या ठिकाणी तुझी कृपा येऊ दे आई..जर मी नरकात ही ऊभा असेन, तरीही ती करूणा तिथे येऊ दे आई..तुझी सप्रेम करूणा, आई तुच वाढव..ज्याचा लाभ मला ही होईल..

जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी..सुरवरईश्वर वरदे तारक संजीवनी..

तु जखम होण्याआधी वाचवणारी आहेस ..

*त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसे नाही..
संपुर्ण विश्वात कोणी ही एवढं सुंदर नाही..

*साही विवाद पडले प्रवाही..
6 शास्त्र जे आहेत त्यावर जे चर्चा करत बसले ते प्रवाहात वाहून गेले..

*लवलाही म्हणजे काय, गवताच्या पाती चा 1000 वा भाग म्हणजे लवलाही..अशी भक्ती..

*प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा..

हे माते तु प्रसन्न वदन अशी खुप सुंदर आहेस! आपण तिचे दास कसे होणार आहोत?? आपण नुसते म्हणालो, कि तु माते किती प्रसन्न आहेस..असं म्हटल्यावर आपल्यातही प्रसन्नता येणार..

*अंबे तुजवीण कोण पुरवील आशा
  नरहर तल्लीन झाला पदपंकज लेशा..

मी भिकारी आहे असं म्हणू नका..जर तुमचा बाप मनाने एवढा श्रीमंत आहे, तर मग तुम्ही असे कसे भिकारी व्हाल?..जे तुम्हाला हवं आहे ते बापाकडे आहे, असं म्हणायला शिका..मग ते आपल्याला नक्कीच मिळणार आहे..हे लक्षात ठेवा..

साईचरित्र मधे 52 वा अध्याय..

पाठीशी असता श्री समर्थ,
कोणीही लावू शकत नाही हात..

मी कसा आहे ते बघू नका. ईतका बारीक आहे, पण देवा तुझ्या बलवान शरीरामधुन मलाही ते दे नं..मग तो नक्की देणार आहे.. देवाची केलेली स्तुती, हा मस्का नाही आहे, तर मग ते आनंदाने मागा..

त्रिविक्रमाचं एक नाव आता मी तुम्हाला सांगणार आहे.. जे नाव आहे.. "अंबज्ञ"..

अंबज्ञ म्हणजेच "मी आहे"..हे चिन्ह, चित्र जे म्हणाल ते आहेच..
आपण जेंव्हा थँक्स म्हणतो, तेंव्हा आपण तेच त्रिविक्रमाचं नाव बोलतो..आपल्याला त्याच्या सारखं बनायचं आहे..जो कधीच घाबरला नाही..असा.. जे आज आपण अग्रलेखात पाहिले आहे..हे सामर्थ्य भक्तिमधे आहे..

जेंव्हा तुम्ही म्हणता, त्रिविक्रमाचा विजय असो..तेंव्हा त्याचा अंश आपल्यात आहे. तेंव्हा तो विजय त्याचा झाला पाहिजे..ठेच लागली, अंबज्ञ म्हणा..यश-अपयश मिळालं तरी अंबज्ञ म्हणा..मला अपयश मिळालं ह्याचा अर्थ ते आपल्याला नरकाकडे नेणारे होते..त्या आदिमातेला लहान मुंगी मधे जेवढं महत्व आहे तेवढा आपल्यामधे इंटरेस्ट आहेच..ते ती कसे करणार आहे, ते आपल्याला पहायची गरज नाही..

तिच्या नावातुनच आलेलं नाव हे त्रिविक्रमाचं आहे..आजपासुन अंबज्ञ हे आपल्या आयुष्यात मुरवा..त्याच्यासाठी प्रत्येक स्त्री ही त्याची कन्या आहे..आणि पुरूष आहे तो त्याचा पुत्रच आहे..

त्रिविक्रमाची ईच्छा असतेच असते कि माझ्या प्रत्येक बाळाने पुढच्या जन्मात मागच्या जन्मापेक्षा 7 पट जास्त सुखी असणारच आहे....

आज संवाद करताना असं मागायचं आहे, तु एवढा शुर आहेस त्यातली थोडी शौर्यता मला पण जरा दे नं..तु सुंदर आहेस पण मग त्यातली सुंदरता मला पण जरा दे नं..

अंबज्ञ..
भाषांतर
मिलिंदसिंह फणसे..

No comments:

Post a Comment