Friday, June 19, 2015

18/06/2015 बापूंचे प्रवचन

हरि ॐ दिनांक 18/06/2015 बापूंचे प्रवचन

हे जातवेदा..आमच्यासाठी आवाहन करून घेऊन ये..जातवेदोमावह..  लोपामुद्रा आवाहन जातवेदाला करते..जातवेद  हे नाव त्रिविक्रमाचे आहे..ती त्याला आवाहन करते कि "हे त्रिविक्रमा, तु लक्ष्मीला घेऊन ये"..जातवेदालाच का..त्रिविक्रमालाच का आवाहन करते? शिवा ला, विष्णू, किरातरूद्राला का नाही? 
जातवेदाचा अर्थ..जो वेदांना जाणतो..पुरेपुर जाणतो..त्याच्यापासुन वेद उत्पन्न झाले आणि वेदांमुळे तो आला..
लोपामुद्रेने त्यालाच आवाहन का केले? चार ही वेदांमधे..ऋषींचे प्रमुख ध्येय काय होतं..'सामान्य मनुष्य' हेच त्यांचं ध्येय..सामान्य मनुष्याचं जीवन  आणि त्यांच्या जिवनात त्यांचा अभ्युदय..प्रापंचिक, शैक्षणिक पासुन ते पारमार्थिक प्रगती..ह्या ऋषींना ह्याची काळजी होती..हे महर्षी होते..पण तरी त्यांचं प्रेम  सामान्य माणसाबद्दल होतं..म्हणुन सामान्य मनुष्यांना कळू शकणार नाही, असं त्यांनी कधीच लिहिलं नाही..ह्या ऋषींना जे काही दिसलं..ऋषींना ब्रम्हर्षी पद प्राप्त झाल्यानंतर अखिल कल्याणासाठी चिंतन करीत असताना जे ज्ञानाचं भंडार त्यांच्यासमोर उघडं केलं..ते ज्ञान..म्हणजे शब्द नव्हे नुसते...जे आहे ते तसंच्या तसं सांगणे..जे जसं आहे त्यानुसार परमेश्वराने निर्मिलेलं आहे, त्याचा परमेश्वरी नियमानुसार उपयोग व्हावा, तेच ज्ञान....
ज्ञान म्हणजे, जो काही विषय आहे..मग ते काही असो..ते का निर्मिलं तिथपासुन ते जाणुन घेऊन त्याचा उचित वापर संपुर्ण विश्वाच्या कल्याणासाठी कसा करता येईल, हे शिकणं; म्हणजे ज्ञान..
वेदांमधे प्रत्येक सुक्तात कुठल्या न कुठल्या देवतेचं आहे..
ह्यातली प्रत्येक ऋचा,  मानव कल्याणाच्या अत्यंत पवित्र भावनेने भरलेली आहे..ह्यात लोपामुद्रा ही प्रमुख आहे..
लोपामुद्रा एक दिवस रस्त्याने चालली होती..तिच्यासमोर मुंगळ्यांची रांग चालली होती.. ते मुंगळे उन्हात चालत होते..मग तिने मुंगळ्यांच्या पायाला चटके बसतात कि नाही हे बघितलं..मग का बसत नाहीत, हे शोधुन काढलं..अन् ते शोधता शोधता तिला चटका बसणं नाहीसं झालं..
जर ती मुंगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी पण तयार आहे..तर आपण सामान्य माणसांनी पण तयार असलंच पाहिजे..तो त्रिविक्रम एकच एक असा आहे, जो वेदांना जाणतो..
म्हणुन तो 'जातवेदा'..
आदिमातेने शेकडो ऋषींना ज्ञान प्रगत केले आणि ते प्रगट होत असताना त्याच्या साक्षीसाठी त्रिविक्रम होता..
तीन पातळ्या.. ज्ञानाच्या...
'बुध्दीची'
'मनाची'.. ज्ञान झालं की ते 'पटणं' आवश्यक असतं..
'क्रियेची'.. मनाला पटलं तरी कृतीच्या पातळीवर यावं लागतं..
आणि ह्या तिन्ही पातळीवर जो कार्य करतो, तो त्रिविक्रम.. आणि म्हणुन वेद आले अन् मग जो जाणता झाला नाही; तर वेद येत असतानाच तो जाणत होता..
ह्या आदिमातेने हे वेद प्रथम त्रिविक्रमाकडे सोपविले.. मग त्याने तीन पावलं एकाच वेळेस टाकत स्थिर केले.. लोपामुद्रा म्हणजे जिला 'ब्रम्ह' म्हणजे काय? ते कळलेलं आहे.. आणि ती ते अनुभवते.. तिच्या जीवनात जरा ही अपवित्रता नाही.. ती ब्रम्हवादिनी.. स्वप्नात ही जी असत्य बोलत नाही...तिला माहित आहे की, त्रिविक्रमानेच सर्वांना वेद दिले..
जो ब्रम्हर्षींना देऊ शकतो ज्ञान तीन ही पातळीवर. मग सामान्य माणसा साठी का नाही...

त्रिविक्रमा शिवाय जीवनामध्ये कुठलं ही सौंदर्य प्राप्त होऊ शकत नाही..जीवनातली कुठली ही गोष्टं मधुर, सुंदर बनवायची असेल तर त्यासाठी तो 'त्रिविक्रम' अत्यंत आवश्यक आहे..

जीवनामधे.. आपण एका कल्पनेत राहतो..आम्हाला सगळं 'परफेक्ट' लागतं.. कोणी ही मानव 'परफेक्ट' असुच शकत नाही.. ते फक्त मोठी आई अन् तिचा पुत्र...
परफेक्शन म्हणजे 'क्षितीज'.. परफेक्शन... म्हणजे जरा ही चुक नसणं.. अचुक.. आणि असं असुच शकत नाही.. पण म्हणजे सर्वच्या सर्व चुक आहे; अशात जगायचं नाही..
Perfection is impossible... हे लबाड बुध्दीमान लोकांनी न्युनगंड उत्पन्न करण्यासाठी बोलतात..  मला perfect नाही तर आज आहे त्यापेक्षा ऊद्या चांगलं बनवायचंय..
जो 'त्रिविक्रमाचा, ह्या आदिमातेचा' झाला; तो प्रत्येक जण प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा अधिक प्रगत झाला पाहिजे.. त्याच्या स्थुल, प्राणमय अन् मनोमय देहात 'त्याची' तीन पावलं उमटत असतात.. तो दररोज लक्ष्मी ला आमच्यासाठी आवाहन करत असतो... म्हणुन ही लोपामुद्रा 'जातवेदाला' आवाहन करते, की लक्ष्मी ला तू घेऊन ये...
आपल्याकडे मोठी capacity (क्षमता) आहे.. आपल्याला प्रार्थना करता येते...प्रार्थना, म्हणजे पुर्ण श्रध्देने 'त्याला' हाक मारणं... ही capacity (क्षमता) माझ्याकडे आहे.. ती मी वापरतो का?
लोपामुद्रा वापरते...
त्रिविक्रम आणि त्याची माता अगदी मुंगी पासुन प्रत्येक मानवाची प्रार्थना ऐकत असतात...
आणि ऐकुन action (कार्यवाही) पण घेतात.. पण ते आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी मला connection (संपर्क) निर्माण करावं लागतं.. आणि त्यासाठी विश्वास पाहिजे...एक विश्वास...आपला विश्वास जर 70% आहे तर 700 पट जास्त येईल.. कुठली ही गोष्टं आपण मागितली आणि जर ती अनुचित नसेल तर ती त्याच क्षणी आलेली असते...पण मला प्रार्थना करता आली पाहिजे...आपल्या शब्दांमधे आपलं म्हणणं, आपल्याला मांडता आलंच पाहिजे..
प्रार्थना म्हणजे नुसतं 'मागणं' नव्हे..
प्रार्थनेचे दोन भाग आहेत..
आरतीमध्ये पहिल्यांदा त्या त्या देवतांवरचा विश्वास आहे...
त्याला म्हणतात, 'स्तुती प्रार्थना'
दुर्गे दुर्घट भारी..... हे आदिमाते, तुझ्या शिवाय ह्या संसारात प्रत्येक गोष्टं कठीण अन् दु:खदायक होऊन बसते..
अनाथ नाथे अंबे...
जो जो म्हणुन कोणी अनाथ आहे त्याला तू सनाथ करणारी आहेस...
अंबे म्हणजे माझी आई...माझी प्रिय आई...हे तीन शब्द एकत्र म्हणजे 'अंबा'... अनाथाची नाथ आहेस तु..मी अनाथ असू शकत नाही..कारण तु माझी प्रिय आई आहेस..
करूणा विस्तारी..हे आदिमाते, तुझी करूणा एवढी अपरंपार आहे..मी खुप लांब ऊभा आहे तुझ्यापासुन..माझ्यात कुठलीही क्षमता नसेल, पण तुझ्यात आहे...तु तुझ्या करूणेचा विस्तार कर..मी आहे; तिथपर्यंत..
मागायचं, कसं मागायचं..आपण मागायला पण शिकलं पाहिजे.. आपल्याला परमेश्वराने 'प्रार्थना' ही शक्ती उपजतच दिली आहे..मानव पहिली प्रार्थना..पहिली 'हाक' आईलाच मारतो..ही 'जगताची आई' आहे..तिला हाक मारण्याशिवाय आपल्याला पर्याय असुच शकत नाही..जसं, त्या बालकाची हाक आई ला कळतेच नं! सामान्य आई ला कळते; तर मग त्या जगदंबेला का कळणार नाही..'ती' प्रार्थना ऐकत असलीच पाहिजे..

दुसरं Proof (पुरावा)
शांत कुठे ही बसा... अन् विचार करा, कि आपण किती चुका केल्या लहानपणापासुन... आणि तरी परमेश्वराने आपल्याला किती दिलं...
म्हणजेच माझी आई लक्ष देत असते..
ती मला सहाय्य देतंच आहे..त्रिविक्रम मला प्रत्येक गोष्टीत सहाय्य करतोच आहे..

तिसरं Proof (पुरावा)
रोज रात्री 10 minutes be still n silent (10 मिनिटे स्थिर न शांत बसा)..आणि शांती अनुभवायची.. हळू हळू तुमच्या मनाला 'शांती' (peace) मिळायला लागेल...
जी उत्तरं तुम्हाला कधी सापडली नव्हती..ती, त्या 10 मिनिटात मिळू लागतील..'ते दोघे'..त्रिविक्रम आणि मोठी आई तुमच्या शांततेचा आवाज 'ऐकतात'
जर ते शांततेचा आवाज ऐकू शकतात, तर बोलण्याचा नक्कीच ऐकतात..जर विचार कुठला आला, तर म्हणायचं; "हा विचार माझा नाही" त्या 10 मिनिटातले 2 सेकंद सुध्दा तुम्हाला आदिमातेशी जोडून देतील..आणि 'हेच ते आवाहन'  जातवेदोमावह:  ...
रात्रीची 10 मिनिटं शांत बसा..शरीर आधी स्थिर अन् मन शांत.. atleast (कमीत-कमी) शरीर तरी स्थिर करूया.. मुद्दाम विचार करायचा नाही..
फक्त आधी बसताना म्हणा..
हरि ॐ   श्रीराम   अंबज्ञ
आणि झाल्यावर म्हणायचं, "जय जगदंब जय दुर्गे"..  जेंव्हा मनुष्य, शरीर स्थिर करतो; तेंव्हा हा त्रिविक्रम त्याची 'तीन पावलं' उचलतोच.  600 सेकंदा मधे कमीत कमी 3 सेकंद तरी तुमचं connection (संपर्क) आदिमातेशी जोडलं जातं..आणि जशी सवय होत जाते तसा तो 3 सेकंदाचा काळ वाढायला लागतो..
उत्साहवर्धक द्रव्य जे लागतं..ते गुह्यसुक्तम् मधुन मिळतं..
10 मिनिटं शांत बसा कि तो त्रिविक्रम तुमचं आयुष्य जाणण्यासाठी आहे. जे जे आवश्यक आहे..ते आणुन देईल..
लक्ष्मी म्हणजे सर्व प्रकारची सौंदर्य-शक्ती..हे सर्व पुरवणारी लक्ष्मी आहे आणि सर्व संपन्नतेला घेऊन येणारा हा त्रिविक्रम आहे..
म्हणुन लोपामुद्रेने म्हटलं...
जातवेदोमावह..
रोज रात्री 10 मिनिटं बसायचं..आधी बसताना म्हणा..हरि ॐ   श्रीराम   अंबज्ञ
शांत बसायचं आहे.. त्या 10 मिनिटात प्रयत्न करूच नका..कुठला ही विचार जर माझ्या मनात आला, तर समजायचं कि तो विचार माझा नव्हता.. अन् झाल्यावर "जय जगदंब जय दुर्गे" म्हणायचं..
रात्री झोपताना रामरक्षा म्हणा..म्हणताना झोप लागली तर तुमचा बाप ती पुर्ण करेल..
आपला बाप अन् आई जे काही करतात ते मुलांसाठी कधीच उपकार नसतात..

म्हणुन ती लोपामुद्रा म्हणते..
हे त्रिविक्रमा, तू त्या लक्ष्मीला माझ्या शेतात, माझ्या कुळात सर्व ठिकाणी येण्यासाठी आवाहन कर अन् घेऊन ये! आणि हा हट्ट फक्त ती बापाकडेच करते.. आपली आजी एवढी असताना, आपला बाप असताना आपल्याला काळजी कसली..आपल्याला काळजी नाही..
ह्या विश्वातील समग्र ज्ञान, म्हणजेच प्रत्येक शुभ गोष्टींचा प्रारंभ..वेद मंत्रानेच होतो..त्रिविक्रम म्हणजे जे जे काही शुभ मंगलमय ते सर्वच्या सर्व जो निर्माण करतो आणि अमंगल दुर करतो, तो त्रिविक्रम..अन् तो जातवेदा..

"ॐ श्री जातवेदाय नम:" 5 वेळा जप करा..

आमचे नातेवाईक आहेत, त्यांनी कधी म्हणायचं..
दर महिन्याच्या 18 तारखेला जो कोणी 5 वेळा हा जप म्हणेल, त्याला आजसारखंच connection (संपर्क) जोडला जाईल..
ज्या दिवशी लक्ष्मीपुजन करू..श्रीसुक्तम् म्हणता आलं तर चांगलंच.. पण हा मंत्र 5 वेळा म्हणुन सांगू शकता! आपल्या भाषेत सांगायचं..की "माझ्याकडे पुजनाला घेऊन ये..

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे

मी अंबज्ञ आहे..
आम्ही अंबज्ञ आहोत...

No comments:

Post a Comment