Thursday, June 25, 2015

25/6/2015 बापूंचे प्रवचन

हरि ॐ दिनांक 25/6/2015  बापूंचे प्रवचन

हे जातवेदा, त्या लक्ष्मी ला आणि महालक्ष्मी ला घेऊन माझ्या शेतात ये. माझ्या घरी ये. तो सर्व जाणणारा असतो..सर्वकाही जाणत असणार आणि म्हणुन इथे 'जातवेद' हेच नाम वापरलं गेलंय..जोपर्यंत आमची खात्री बसत नाही, तोपर्यंत तो आपल्यासाठी असतोच..आम्ही 99.99% सत्य सांगितलं आणि 0.01% नाही सांगितलं! पण हे त्याला कळणारच आहे..
तुमच्याच काही गोष्टी तुम्हाला माहित नसतात. पण त्याला काही माहित नाही; असं काहीच नाही.
आपण ठरवलं, कि नातेवाईकाचं नाव लिहून काढा आणि वय लिहा; ते करता येणार नाही..
समजा, मी डॉक्टर आहे. पण बाकीचं मला काही माहित आहे का? प्रत्येक श्रध्दावानाने विचार केला पाहिजे की "माझी capacity (क्षमता) किती आहे?
'स्वस्तिक्षेम संवादा' मधे आई शी आपण बोलतो. तेंव्हा ते ह्या जातवेदाला कळतच असतं
साई चरित्रामधे दामू अण्णाची गोष्ट आहे. 'त्याला बाजार कसा करायचा, ते माहित असतं. पण त्याने पैसे घातल्यावर त्याचं नुकसान होणार आहे' ते फक्त "त्यालाच" माहित असतं!
संवाद करताना हे लक्षात ठेवा की, "तो" सगळंच जाणतो..आणि त्यामुळे त्याची आई ही त्याला जाणते..मग आपल्या मनातला पहिला अहं.. काढायला हवा कि 'त्याना काही कळत नाही'..
मग आपण म्हणू की, जर 'त्याना' माहित आहे तर मग परत त्यांना काय सांगायचं?
उदाहरणार्थ: स्वत:ची बायको आपल्याला माहित असते..पण ती सांगण्यासाठी आपण तीचं नाव बदलतोच नं!
प्रार्थना ही आपण कशी करायची, हे कोणीच ठरवलं नाही. पण जर असं असतं तर ह्या India मधे असे कितीतरी बरेच प्रार्थनेचे प्रकार झाले असते!
दिवस दिवस बसा..  आणि सगळ्या देवाना मोजायला बसा.. आमचा जेजुरीचा खंडोबा वेगळा आणि तुमचा वेगळा..
आता प्रत्येकाचे वेगवेगळे देव आणि त्या प्रत्येकाच्या प्रार्थना ही वेगळ्या!
आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही, तर आपण समोर को‌णी बोलायला लागलं की आपण गप्प बसतो. पण समोरचा युरोपियन जर आपली भाषा बोलायला लागला तर आपण त्याचे कौतुक करतो..जरी त्याचे उच्चार नीट नसले तरी..
मग आपले इंग्लिशचे उच्चार नीट नाहीत म्हणुन मग आपण इंग्लिश बोलत नाही..
का?  कारण आपण त्यावेळी ह्या लोकांना हसतो..
ह्या भारतीय संस्कृती मधे उच्चाराला प्राधान्य दिलं गेलेय..'चण्डी पाठ' ह्या मधे उच्चारात चुक झाली; तर मग बरोबर नाही, असं म्हणतात. पण इथे जो प्रेम-पुर्वक ह्याचे पारायण करेल, त्याला हे व्याकरणाचे नियम लागू होत नाहीत..
आपण हिन्दी बोलताना अडकतो..आपली राष्ट्रभाषा हिन्दी आहे. भाषा ही समजण्यासाठी असते.
देवाकडे मागताना जे हवं, ते मागा. त्यासाठी कोणतीच भाषा लागत नाही. पण  त्याच्या समोर बोलताना कधीच खोटं बोलू नका.
कारण जर आपण विसरलो की हा 'जातवेद' आहे; आणि जेंव्हा जी गोष्ट घडते, तेंव्हाच्या तेंव्हा 'त्याला' कळलेली असते. चुक झालेली गोष्ट आपण आपल्या बाजुने फिरवुन फिरवुन सांगितली तरी त्या गोष्टी तो जातवेद आणि त्याची आई कधीच ऐकत नाही..
आपण जेंव्हा काही ही फोटो समोर सांगतो तेंव्हा ते 'खरं' असेल तरच तो ऐकतो..
माझी चुक असेल तर मला ती दाखवुन दे! आणि ती correct (दुरूस्त) कर. 'आई' जो आपल्या कानाला, जो शंख लावुन आहे; त्यातुन ती आपलं 'बोलणं' ऐकते. शंखाचं कार्य काय? तर तो आवाज मोठा करतात. आणि नुसत्या एका फुंके नी! आणि त्या आवाजाला वाघ, सिंह ही घाबरतात..
शंख अजुन काय करतो. तर Positive Vibration (सकारात्मक स्पंदने) तयार करतो. त्याच शंखातुन आई आपलं बोलणं ऐकते..
कारण मनापासुन आई शी बोलतो आहोत ते शुध्द होऊन आई ऐकते
जगात काय चालू आहे ते आपण पहातोय! त्यातुन नीट रहायचं आहे! तर आपल्या मोठ्या आई च्या चरणांशी रहायचे आहे..
त्रिविक्रमाचा शंख हे प्रमुख symbol (चिन्ह) आहे. आणि त्यातुन आवाज 'डमरू'चा येतो..म्हणजेच त्याला 100% फळ मिळणारच आहे.
पण "जो" सगळं जाणतोच त्याच्या समोर बोलताना excuses (कारणं/बहाणे) चालत नाहीत.
लोपामुद्रेने हे सुक्तम् लिहिले तेंव्हा तिने 'जातवेद' हा शब्द वापरला. तोच महालक्ष्मी ला आपल्याकडे घेऊन येतो..
आजपासुन निश्चय करायचा आहे कि "तो आणि त्याची आई सगळं जाणंतच आहेत"
आणि म्हणायचं आहे कि, "मी ह्या त्रिविक्रमाचा लाडका पुत्र आणि आईचा लाडका नातू/नात आहेच..

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे

मी अंबज्ञ आहे.
आम्ही अंबज्ञ आहोत..

No comments:

Post a Comment