My Blog List

Thursday, November 27, 2014

Pravachan on Sansar Sukhacha 27th November 2014

27/11/2014

Hariom
Avghachi sansar sujhacha karin
Sadha principle vaprycha.. 

God is for  everything.

N hya sathi pn hak maryla phije..deva lksht rahu de.
Aj aplyala dusra bhag bghychai..
Ha algorthm jo ahe..
Sansar sukhacha krnuasathi kay kay karava..
१*9+2=11(algorthm)
Ha ksa karya karto..sansarat.
1*9 Mhnje ky.. n adhik 2 Mhnje ky..

God is for  everything.


हरि ॐ
अवघाचि संसार सुखाचा करीन
साधं प्रिन्सिपल वापरायचं
God is for everything.
अन् ह्यासाठी पण हाक मारायला पाहिजे..देवा लक्ष राहू दे.
आज आपल्याला दुसरा भाग बघायचाय..
हा अल्गोरिदम जो आहे..
संसार सुखाचा करण्यासाठी काय काय करावं..
1x9+2=11 (अल्गोरिदम)
हा कसं कार्य करतो, संसारात..
1×9 म्हणजे काय..अन् अधिक 2 म्हणजे काय..
God is for everything...
आपल्याकडे आपण जन्माला येतो..तेंव्हा त्याने दिलेला आहे...ते आईच्या प्रयासाने 9 महिने वाढतं..
9 महिन्यात त्याचा गुणाकार केला जातो..
11 आणण्यासाठी नाही..तो आपोआप येतो..
मग 2 आकडा काय दाखवतो.. 1 च्या पुढची गोष्ट..
आतापर्यंत आई-बाळ एकमेकाना जोडलेले होते...
आता आई व बाळ जरी एकत्र असले, तरी वेगळे वेगळे झाले...9 चा गुणाकार म्हणजे दैवी भाग आहे.अन 2 हे आपले घालावे लागतात..सुरवात 11 ने होते.. पुढची पायरी आहे..
12×9+3=111
हे 12 म्हणजे एक वर्ष..एक वर्षात बाळ थोडं थोडं चालायला लागतं..ह्या 12ला परमेश्वर 9 ने गुणतो..
इथे 3 काय..बाळ स्वत: आई अन् आता वडिल...
अन् त्यातुन मग तो बरोबर balance आकडा करतो..जर आपण आपला घालायला विसरलो तर अपेक्षित यश मिळू शकत नाही..
उदा..मुलाशी एकही शब्द बोलला नाहीत, तर मुलगा बोलायला शिकेल का...नाही..
हे प्रयास म्हणजे तिघांचा 3 आकडा
123×9+4=1111
आता 123 म्हणजे काय..
ह्या आकड्याची रचना आपल्याला समजुन घ्यायला पाहिजे... पहिला येतो 1 मग 2 मग 3
1 हा मुलभुत आकडा आहे.. त्या एक मधे एक मिळवला तर 2 होतात.. 2 अधिक एक 3.. असे पुढे जातात.. 7, 13 हे मुळ अंक आहेत..7 कसा लिहिणार...5+2 आणि 13=7+5+1
47= 7+7+7+7+7+7+5
प्रत्येक आकडा जेंव्हा सोडतो, तेंव्हा 1 2 3 ह्या तिघांचाच खेळ चालू असतो..123 हा जो आकडा आहे..ह्या संख्येमधे मोठा आकडा कुठला? तर 1 (कारण इथे 1 मधे 100 [एकशे] आहे) त्याची ताकद बघितली तर.. म्हणुन ह्या 123 आकड्याला खुप मोठं महत्व आहे.. बघताना 1 पेक्षा 2 अन् 2 पेक्षा 3 मोठा.. ह्या 123 आकड्याला म्हणुन 'व्युह' संख्या (चक्रव्युह) म्हणतात..व्युह म्हणजे PLAN जो कोणीच तोडू शकत नाही..
योगायोग
आपण नहीं रे बाबा किसमें. ही, Exactly हि सिस्टम, हाच परमेश्वराचा व्युह असतो..म्हणजे तो आम्हाला एवढं देत राहतो..जन्मापासुन...
दिसताना असं वाटतं कि मी सगळं करतो..असं दिसणारा हा 3 नं. असतो..
पण हे सगळं खरं करणारा तो 1 न् 2 आकडा असतो..म्हणुन नेहमी ambadnya रहायचं..
Add केलेले आकडे वाढत जातात..उदा.2,3,4
पण त्या आधीचा गुणाकार मोठा आहे.
123 - अं ब ज
123 म्हणजे अं ब ज्ञ
बाराखडी मधे..
अ हा पहिला आकडा आहे.. आणि अं हा शेवटचा.
म्हणजे पहिला अन् शेवटी असणारा हा एकच आहे.
तसाच ज्ञ हा शेवटचा आकडा आहे..आपल्या ह्या संस्कृत भाषेमधे.. प्रत्येक अक्षराची स्पंदनं आहेत..
अशीच नाही निर्माण झाली अक्षरं..
अंबज्ञ आपण जेंव्हा म्हणतो, तेंव्हा जाणत असतो
कि 1 न् 2 ही पण सगळी ती जगदंबा चण्डिका दुर्गा करत असते.
आपल्याला फक्त कृतज्ञ राहायचेय.. 3 असो 4 असो..काही असो, she doesn't bother..
(ती पर्वा करत नाही) 123 हा, 'अंबज्ञ' आहे..
1 न् 2 म्हणजे 'ती' न् 'तिचा पुत्र' आपल्याला आनंद करायचा आहे. त्याने आपल्याला जी गोष्ट दिलेली आहे, त्याचा आनंद घ्यायचाय..
सदुपयोग करायचाय.. आमच्या जीवनात 123 क्रमांक हा महत्वाचा आहे..
123 म्हणजे 'अंबज्ञता' हे जाणण्याचं जे वय आहे
तर 123 महिने...10 वर्ष 3 महिने...
ह्या काळापर्यंत आमच्याकडे अंबज्ञता पुरविली जाते
त्यानंतर.. 14 वर्षापर्यंत तो जर अंबज्ञ राहायला शिकला नाही तर आधीचे सगळे गुणाकार चुकतात.
7व्या वर्षात.. जर हनुमान चालिसा शिकवला अंबज्ञ म्हणायला शिकवलं..ह्याने आपोआप संस्कार व्हायला लागतात. मग 14 वर्षापर्यंत त्याची तयारी झालेली असते.. आपल्याला हा शब्द मिळाला आहे.
आपण ही शिकुया न् मुलांना शिकवुया..
123 म्हणजे अंबज्ञता.. एकदा ही अंबज्ञता आली आपल्याकडे कि तिला पण 9 ने गुणतो..मग आपल्याला फक्त 4 add करायचे असतात.
(123×9+4=1111) हे 4 म्हणजे काय
14 व्या वर्षापासुन सप्तचक्र सुरू व्हायला लागतात
मुलाधार चक्र हे पहिले चक्र..ह्याच्या 4 पाकळ्या म्हणजे.. आहार, विहार, आचार, विचार..
ह्या त्या 4 गोष्टी add करायच्या. अंबज्ञ आलं, कि ह्या 4 गोष्टींची काळजी घ्यायची.. ह्या 4 गोष्टी अंबज्ञतेच्या गुणाकाराला लागतात.. म्हणजे तुमचं जीवन ऐहिक दृष्ट्या म्हणजे भौतिक दृष्ट्या..पुर्ण होण्यासाठी ह्या 4 गोष्टींची काळजी घ्यायची..
ह्याने 'मन' बनतं..हे राहिलं कि आपलं शारिरिक, मानसिक अन् आध्यात्मिक आरोग्य व्यवस्थित राहतं
आपल्या प्रत्येकाच्या विचारांचा आपल्यावर अन् दुस-यांवर परिणाम होत असतो..जेवढी विचारांची तीव्रता जास्त, तेवढा जास्त effct होतो.. रागाच्या भरात जे काही विचार करतो त्याला अंत नसतो..
पण त्यात जर अंबज्ञ राहिलो..तर तो अर्ध कमी करतो. भांडणाचं कारण छोटं असतं, पण राग जास्ती.. मला माझ्या रागावर कंट्रोल करता आला पाहिजे.. राग येतो तेंव्हाच कंट्रोलची आवश्यकता असते..जर आम्ही अंबज्ञ नेहमी वापरत असू..तर जेंव्हा कंट्रोल लावू शकत नसू, तेंव्हा भगवंत दुसरे कारणाने ब्रेक लावतो.. भगवंत ती काळजी घेतो..
पण जेंव्हा आपण अंबज्ञ असु तेंव्हाच!
ह्या व्युह संख्ये मधे फक्त 4 add करायचे..
13 डिसेंबर ला मी जे बोलणार..त्यात आपण हेल्थ विषयी म्हणजे ह्या चार ही विषयी बोलणार आहोत..
आध्यात्मिक दृष्टी काही नाही..पुर्णपणे ऐहिक, प्रापंचिक विषयावर बोलणार आहोत. आपल्या आतमधे जो प्राणात्म्याचा अंश आहे, त्याचं मंदिर कसं बनवायचं, हे बघणार आहोत. त्यातला आचार न् विचार हे भाग प्रवचनात होतीलच!
ह्या पुढचे सगळे जे आकडे आहेत...6 स्टार म्हणजे.
123×9+4=1111
म्हणजे मर्त्यलोक किंवा भुलोक.. आणि ह्या पुढचे..
भुव
स्वाहा
मह:
जन:
भर्ग हे सप्तलोक
शेवटी 4 हे 4th dimension....
भु भुव स्वाहा.. हे 3 dimensional आहे.
हे 4 आकडे जर ओळखता आले तर आपलं सगळं सोप्पं होईल.. आता ह्या 4 मधे काय add करायचे म्हणजे 5 होईल.. न् मग 6 हवा तर काय add करायचं.. तर भक्ती अन् मर्यादा.. भक्ती प्रेमाशिवाय शक्यच नाही..इतरांपेक्षा तुमचं जीवन अधिक शांत व्हावं, असं वाटतं तर त्यासाठी मर्यादा ठेवावी लागते. धर्मग्रंथ मर्यादा शिकवतो. महत्वाची वाक्य विसरायची नसतात. ह्रदयात धारण करून ठेवा. 123 हा आकडा म्हणजे अंबज्ञता.
1 2 ला 3 बरोबरच नाही तर 4 5 ह्या सर्व आकड्याना जोडणारा शब्द म्हणजे 'अंबज्ञ'
आपण जेंव्हा ॐ म्हणतो.. तेंव्हा त्यासाठी मन तेवढं पवित्र लागतं. अंबज्ञ शब्द.. आपलं मन कितीही अस्थिर, श्रध्दा कमी असली असं असलं तरी ह्या शब्दाची स्पंदनं त्यांच्या सपोर्ट नी मनुष्याच्या पेशी न पेशी मधे जाऊन पोहोचतातच!
आपल्या जीवनात रागावर कंट्रोल ठेवावा.
आपण म्हणतो, तोंडावर आलेलं पण बोललो नाही, बरं झालं..हा ब्रेक कोण लावतो? तो लावतो.
हा अल्गोरिदम काय शिकवतो..तर भु भुव स्वाहा...
आपलं जीवन त्या स्वर्गलोकाशी जोडलेलं आहे..ह्याच्याशी जे काही संबंधित आहे..त्यासाठी प्रवासाची आवश्यकता नाही..
आपल्याला शिकायचय..ह्या त्रिविक्रमाचं अन् अंबज्ञतेचं अत्यंत जवळचं नातं आहे..
प्राण मन बुध्दी मधे ही हा अंबज्ञ शब्द जातो.
Not only in peshis (फक्त पेशींमधेच नाही)..
हा त्रिविक्रम प्रत्येक ठिकाणी जाऊन काम करतो..
अंबज्ञ हा त्रिविक्रमानेच दिलेला आहे. समस्त रोगांचं निवारण करतो तो त्रिविक्रम..नोकरी सुटणं, घरात भांडण होणं.. हा रोगच आहे.
आज.. आपण स्वस्तिक्षेम संवाद परत करणार आहोत.. पण आता काही मागत बसु नका... त्या वेळेत फक्त मनापासुन स्विकारा..
हा शब्द माझ्या मनात शरीरात शिरतोय, ही भावना
घट्ट करा.. अन् ते आपोआप होतंही...
अंबज्ञ.

Ambadnya.

No comments:

Post a Comment