My Blog List

Wednesday, February 18, 2015

महाशिवरात्री 21/03/2013

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२१.०३.२०१३)

॥ हरि ॐ॥

महाशिवरात्रीचा दिवस, हा नंदीपक्ष
ह्यामधील शिवाची उपासना.
भारतीयांचं अतिशय जवळचं नातं
जोडलेल असतं शिवाशी, पार्वतीशी,
त्यांच्या दोन बाळांशी, नंदीशी.

शिवरात्र, देवीच्या बाबतीतसुद्धा
नवरात्री व शिवाच्या बाबतीत
शिवरात्री. रात्रीच का? उपवास
तर आपण सकाळी करतो.

रात्र आणि अंधार ह्याच्या मधला
फरक ओळखायला शिका.
रात्र म्हणजे अंधार नव्हे, आणि
अंधार म्हणजे रात्र नव्हे.
तुम्ही तुमच्या खोलीची खिडकी दारं
बंद केली तर अंधार झाला,
रात्र झाली का? रात्री दिवे लावलेत,
सगळीकडे उजेड आहे
पण म्हणून बाहेर रात्र नाही असं नाही
होत.

रात्र व अंधार एकरूप नाहीयेत. रात्र
झाल्यावर अंधाराची भीती
वाटते हे दोघे एक नाहीत हे कळलं तर
५० टक्के भीती निघून जाते.

रात्रीला तीन भागात विभागले आहे - 
१) मोहरात्री २) कालरात्री
३) महाकालरात्री ही तीनही
आदिमातेचीच नावं आहेत.
ब्रह्मदेवाने मातृवात्सल्यविन्दानम्‌
मध्ये स्तोत्रात वर्णनकेले आहे.

रात्र आणि देवीत्व ह्यांचा संबंध आहे.
रात्री-अरात्री ह्याचा अत्रिशी संबंध
आहे. रात्र म्हणजे शांती, थकलेल्या
जीवाला मिळणारा आराम, जोमाने
नवीन काम करण्यासाठी क्षणभर
घेतलेला हॉल्ट, नवनिर्मितीची तयारी  

दिवसभर एखाद्याला जेवायला
घातलं, पण रात्री झोपू दिलं नाही,
तर काय परिस्थिती होईल? दोन-तीन
दिवसांनी तो म्हणेल जेवायला
नको पण झोपायला द्या. एवढी ह्या
झोपेची, विश्रांतीची मनुष्याला गरज
आहे. केवळ इंधन पुरवून चालत
नाही. तुम्ही नुसतं इंधन पुरवलं आणि
गाडी सतत चालूच ठेवली तर
गाडी बिघडणार नाही का? रात्र म्हणजे
नवनिर्मितीसाठी जुनी मरगळ काढावी
लागते हे सगळं करावं लागतं ते म्हणजे रात्र.
शिवरात्र का? आपल्या शरीरात नऊ
चक्र असतात. त्यातील सात जागृतावस्थेत असतात आणि दोन सुप्तावस्थेत
असतात. हृदयाच्या जागी जे अनाहत
चक्र असते त्याचा स्वामी परमशिव
आहे. जोपर्यंत त्या परमशिवाचा
डमरू वाजतोय तोपर्यंत मनुष्य जिवंत
असतो. मनुष्याच्या देहाच्या हृदयातील
लबडब आवाज म्हणजेच शिवाच्या
डमरूचा ध्वनी.
डमरू झोप न घेता चालत असतो. हा परमशिव
लबडब ह्या ध्वनीच्या वेळेस जागा आहे. 
डमरूच्या दोन स्पंदनामधला जो
काळ आहे, जी जागा आहे ती जागा
म्हणजे चिंतनशील, ध्यानस्थ शिव आहे. तो कोणाचं ध्यानं करतोय?
ज्याच्या शरीरात ध्वनी वाजतोय
त्याचं. ह्या जागेत तो निद्रिस्त,
बेशुद्धावस्थेत नाहीये. तुम्ही जितक्यांदा
परमेश्वराचं स्मरण करता, त्याचं
गुणगाण करता त्यापेक्षा जास्त परमेश्वर
तुमचं ध्यान करतो. म्हणून मी एवढं
पठण केलं, एवढा जप केला हा
अहंकार सोडा.
तुम्ही त्याचं नाव घ्या अगर नका घेऊ,
तो दर मिनिटाला ७२ वेळा तुमचं ध्यान
करत असतो. तो प्रत्येकाच्या आत
आहे, त्यामुळे त्याला तुमची प्रत्येक
गोष्ट कळत असते.
ह्याची भीती बाळगायची नाही. तो प्रेमाने
ध्यान करतो, जसं एखादी आई आपल्या
बाळाचं ध्यान करते तसं
त्या रात्रीमध्ये तुमच्याकडून सगळी
माहिती घेतो, ह्या क्षणाला हे घडलं,
तर ह्याच्या पुढच्या क्षणाला काय घडेल, ह्याचं तो प्लानिंग करत असतो. तुमच्यासाठी
शिवाची रात्र आहे तुमच्या भविष्याची
योजना तो करतो म्हणून शिवरात्रीला
शिवाची उपासना करायला हवी.

जो परमात्मा आपली ७२ वेळा आठवण ठेवतो, ७२ वेळा ध्यान करतो त्याचं
वर्षातून एका महाशिवरात्रीच्या दिवशी
ध्यान करायला काय हरकत आहे?
बेलाचं पान म्हणजे दोन हस्त आणि
एक मस्तक वालुकेश्वराला वहायचं
पण हे मी आधी सांगूनसुद्धा कोणी
लक्षात घेत नाही. तुम्ही कोणाचे हात
किंवा मस्तक अर्पण करू शकत नाही
म्हणून कोणाकडूनही बेल घेऊन अर्पण
करू नका. बेल नसतील तर देवाला
दोन्ही हात आणि मस्तक तुझ्या
चरणी अर्पण करतो म्हणून सांगा.

हस्त म्हणजे कर्मेन्द्रिय म्हणजे प्रत्येक
कर्म आणि मस्तक म्हणजे ज्ञान माहीत असलेलं आणि नसलेलं मी तुझ्या
चरणी वाहतो तुला जे द्यायचं ते दे असं
सांगा. तो तुम्हाला त्यातून चांगलं तेच
देणार म्हणून आपलं
कर्म आणि आपलं ज्ञान म्हणजे अनुभव
त्याच्या चरणी अर्पण करायचं.

हे बेलाचं पान म्हणजे माझं मस्तक
आणि माझे दोन हात आहेत, म्हणजे माझा
आतापर्यंतचा अनुभव आणि कर्म मी
तुझ्या चरणी वाहतो. त्यातून तू जे
द्यायचं ते दे.

हे बेल वालुकेश्वराला वाहताना श्रीस्वतिक्षेम्‌
संवाद होणारच आहे. तुम्ही जेव्हा लिंगाभोवती
बेल वाहणार आहात तेव्हा आपोआप सर्व होणारच आहे.
 

॥ हरि ॐ॥

महाशिवरात्री 21/03/2013

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२१.०३.२०१३)

॥ हरि ॐ॥

महाशिवरात्रीचा दिवस, हा नंदीपक्ष
ह्यामधील शिवाची उपासना.
भारतीयांचं अतिशय जवळचं नातं
जोडलेल असतं शिवाशी, पार्वतीशी,
त्यांच्या दोन बाळांशी, नंदीशी.

शिवरात्र, देवीच्या बाबतीतसुद्धा
नवरात्री व शिवाच्या बाबतीत
शिवरात्री. रात्रीच का? उपवास
तर आपण सकाळी करतो.

रात्र आणि अंधार ह्याच्या मधला
फरक ओळखायला शिका.
रात्र म्हणजे अंधार नव्हे, आणि
अंधार म्हणजे रात्र नव्हे.
तुम्ही तुमच्या खोलीची खिडकी दारं
बंद केली तर अंधार झाला,
रात्र झाली का? रात्री दिवे लावलेत,
सगळीकडे उजेड आहे
पण म्हणून बाहेर रात्र नाही असं नाही
होत.

रात्र व अंधार एकरूप नाहीयेत. रात्र
झाल्यावर अंधाराची भीती
वाटते हे दोघे एक नाहीत हे कळलं तर
५० टक्के भीती निघून जाते.

रात्रीला तीन भागात विभागले आहे - 
१) मोहरात्री २) कालरात्री
३) महाकालरात्री ही तीनही
आदिमातेचीच नावं आहेत.
ब्रह्मदेवाने मातृवात्सल्यविन्दानम्‌
मध्ये स्तोत्रात वर्णनकेले आहे.

रात्र आणि देवीत्व ह्यांचा संबंध आहे.
रात्री-अरात्री ह्याचा अत्रिशी संबंध
आहे. रात्र म्हणजे शांती, थकलेल्या
जीवाला मिळणारा आराम, जोमाने
नवीन काम करण्यासाठी क्षणभर
घेतलेला हॉल्ट, नवनिर्मितीची तयारी  

दिवसभर एखाद्याला जेवायला
घातलं, पण रात्री झोपू दिलं नाही,
तर काय परिस्थिती होईल? दोन-तीन
दिवसांनी तो म्हणेल जेवायला
नको पण झोपायला द्या. एवढी ह्या
झोपेची, विश्रांतीची मनुष्याला गरज
आहे. केवळ इंधन पुरवून चालत
नाही. तुम्ही नुसतं इंधन पुरवलं आणि
गाडी सतत चालूच ठेवली तर
गाडी बिघडणार नाही का? रात्र म्हणजे
नवनिर्मितीसाठी जुनी मरगळ काढावी
लागते हे सगळं करावं लागतं ते म्हणजे रात्र.
शिवरात्र का? आपल्या शरीरात नऊ
चक्र असतात. त्यातील सात जागृतावस्थेत असतात आणि दोन सुप्तावस्थेत
असतात. हृदयाच्या जागी जे अनाहत
चक्र असते त्याचा स्वामी परमशिव
आहे. जोपर्यंत त्या परमशिवाचा
डमरू वाजतोय तोपर्यंत मनुष्य जिवंत
असतो. मनुष्याच्या देहाच्या हृदयातील
लबडब आवाज म्हणजेच शिवाच्या
डमरूचा ध्वनी.
डमरू झोप न घेता चालत असतो. हा परमशिव
लबडब ह्या ध्वनीच्या वेळेस जागा आहे. 
डमरूच्या दोन स्पंदनामधला जो
काळ आहे, जी जागा आहे ती जागा
म्हणजे चिंतनशील, ध्यानस्थ शिव आहे. तो कोणाचं ध्यानं करतोय?
ज्याच्या शरीरात ध्वनी वाजतोय
त्याचं. ह्या जागेत तो निद्रिस्त,
बेशुद्धावस्थेत नाहीये. तुम्ही जितक्यांदा
परमेश्वराचं स्मरण करता, त्याचं
गुणगाण करता त्यापेक्षा जास्त परमेश्वर
तुमचं ध्यान करतो. म्हणून मी एवढं
पठण केलं, एवढा जप केला हा
अहंकार सोडा.
तुम्ही त्याचं नाव घ्या अगर नका घेऊ,
तो दर मिनिटाला ७२ वेळा तुमचं ध्यान
करत असतो. तो प्रत्येकाच्या आत
आहे, त्यामुळे त्याला तुमची प्रत्येक
गोष्ट कळत असते.
ह्याची भीती बाळगायची नाही. तो प्रेमाने
ध्यान करतो, जसं एखादी आई आपल्या
बाळाचं ध्यान करते तसं
त्या रात्रीमध्ये तुमच्याकडून सगळी
माहिती घेतो, ह्या क्षणाला हे घडलं,
तर ह्याच्या पुढच्या क्षणाला काय घडेल, ह्याचं तो प्लानिंग करत असतो. तुमच्यासाठी
शिवाची रात्र आहे तुमच्या भविष्याची
योजना तो करतो म्हणून शिवरात्रीला
शिवाची उपासना करायला हवी.

जो परमात्मा आपली ७२ वेळा आठवण ठेवतो, ७२ वेळा ध्यान करतो त्याचं
वर्षातून एका महाशिवरात्रीच्या दिवशी
ध्यान करायला काय हरकत आहे?
बेलाचं पान म्हणजे दोन हस्त आणि
एक मस्तक वालुकेश्वराला वहायचं
पण हे मी आधी सांगूनसुद्धा कोणी
लक्षात घेत नाही. तुम्ही कोणाचे हात
किंवा मस्तक अर्पण करू शकत नाही
म्हणून कोणाकडूनही बेल घेऊन अर्पण
करू नका. बेल नसतील तर देवाला
दोन्ही हात आणि मस्तक तुझ्या
चरणी अर्पण करतो म्हणून सांगा.

हस्त म्हणजे कर्मेन्द्रिय म्हणजे प्रत्येक
कर्म आणि मस्तक म्हणजे ज्ञान माहीत असलेलं आणि नसलेलं मी तुझ्या
चरणी वाहतो तुला जे द्यायचं ते दे असं
सांगा. तो तुम्हाला त्यातून चांगलं तेच
देणार म्हणून आपलं
कर्म आणि आपलं ज्ञान म्हणजे अनुभव
त्याच्या चरणी अर्पण करायचं.

हे बेलाचं पान म्हणजे माझं मस्तक
आणि माझे दोन हात आहेत, म्हणजे माझा
आतापर्यंतचा अनुभव आणि कर्म मी
तुझ्या चरणी वाहतो. त्यातून तू जे
द्यायचं ते दे.

हे बेल वालुकेश्वराला वाहताना श्रीस्वतिक्षेम्‌
संवाद होणारच आहे. तुम्ही जेव्हा लिंगाभोवती
बेल वाहणार आहात तेव्हा आपोआप सर्व होणारच आहे.
 

॥ हरि ॐ॥

Tuesday, February 17, 2015

महाशिवरात्री 27/02/2014

॥ हरि ॐ॥

 

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२७.२.२०१४) Sadguru Aniruddha Bapu's Thursday Discourse (27.02.2014)
॥ हरि ॐ ॥

महाशिवरात्री आपण काय-काय करतो. उपवास करतो आणि काय-काय करतो. महाशिवरात्री म्हणजे काय? ही रात्र आहे मग दिवस कुठून आला. नवरात्रीला - नवरात्रीचे दिवस म्हणतो. नऊ दिवस नवरात्र असल्यामुळे, रात्रीमध्ये दिवस आहे. पण महाशिवरात्र तर एकच दिवस असते. दिवसभरात उपवासाचे पदार्थ खायचे बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, वरीच्या तांदळाचा भात, शेंगदाण्याची आमटी, फ्रुट सलाड खातो.

देवीच्या बाबतीत आणि शिवाच्या बाबतीतही रात्रच महत्वाची असते. रात्र म्हणजे अंधार नाही. मातृवात्सल्यविन्दानम् मध्ये आपण अनसूया-अत्रि ह्या प्रकरणात अरात्री म्हणजे काय हे बघितलयं. आदिमाता आणि तिचा पुत्र शिव ह्याचं प्रदोष समयाला पूजन करणं श्रेष्ठ मानलं जातं, बेस्ट मानलं जातं. प्रदोष समय म्हणजे सूर्यास्ताआधीचा अर्धा तास आणि सूर्यास्तानंतरचा दीड तास. ‘प्र’ म्हणजे सातत्याने. पण इथे अर्थ आहे ‘प्रकर्षाने’ संस्कृत व्याकरण आणि व्ययव्याकरण वेगवेगळ आहे. ‘अ’ तुम्ही अनुस्वार दिला की आपण (अं) -‘अम्बा’ म्हणतो आणि ‘घ’ वर अनुस्वार दिला की आपण (घं) - ‘घण्टा’ म्हणतो. अनुस्वार तोच आहे पण उच्चार वेगवेगळे आहेत. हा व्याकरण आणि व्ययव्याकरणामधला फरक आहे. तसंच इथे ‘दोष’ म्हणजे ‘फॉल्ट’ म्हणून नाही वापरला आहे. आपल्या शरीरातही ‘दोष’ असतात - वात, पित्त, कफ हे फॉल्ट नाहीयेत. ‘दोष’ म्हणजे ‘मूलभूत घटक’. सर्व सृष्टीतील मूलभूत घटक, तत्व अतिशय प्रकर्षाने कार्यरत होतात त्याला ‘प्रदोषकाळ’ म्हणतात. आम्हाला शिवाची भीती वाटत असते. आम्ही त्याच्या क्रोधाच्या कथा ऐकलेल्या असतात. तो भोलेनाथ म्हणूनही प्रसिद्ध आहे. पाणी-बर्फ-वाफ वेगवेगळे असतील पण केमिकल एकच आहे. मृत्यू देणं त्याचं काम नाहीए. तो transform करतो. वाल्याचा वाल्मिकी करतो. हे नुसतचं रुपांतर नाहिए, हे गुणांतरही आहे. Transform कायापालट घडवून आणणं ही प्रक्रिया परमशिवामुळे घडते. हा ह्या क्रियेचा स्वामी आहे. आपल्यात बदल तेव्हा घडायला हवेत, जेव्हा त्याची गरज असते. देवाच नाव तरुणपणी घेतलं तर फायदा झाला असता, म्हातारपणी नाम घेऊन तो फायदा घेण्यासाठी जिवंत तर असायला पाहिजे. जेव्हा बदल स्वीकारायची मनोभूमी तयार असते, तेव्हा बदल व्हायला हवेत. प्रदोष काळात शिवाचं पूजन करणं म्हणजे शिवाला प्रार्थना करणं, “देवा, माझ्या मनात, शरीरात, प्रारब्धात, पुर्व जन्मात, पुढच्या जन्मात, आजच्या जन्मात जे काही transform घडवायचं आहे ते तू तुझ्या मनाप्रमाणे घडवून आण.”

आम्ही देवाला किती सूचना करत असतो? देवा, transform तुला पाहिजे तसं कर असं कधी म्हणतो का? नाही. घर घ्यायचं असलं तरी त्याला सूचना करत असतो, मला अमूक ठिकाणी, अमूक गल्लीमध्ये अमूक-अमूक जागेवरच घर दे, त्याच्या आजूबाजूला हे नको, ते नको. किती सूचना करत असतो त्याला. देवाला फक्त एवढंच सांगा की ‘बेस्ट रचनेत नेऊन ठेव.’

देवाला सांगता, ‘देवा, मला सगळ्यांपेक्षा चांगलं व्ह्यायचयं पण त्यामध्ये त्याला आम्ही ऑप्शन देतो. देवाला कधीच ऑप्शन्स देऊ नका. जर तुमची श्रद्धा खरी असेल तर, तो तुमचं मुळीच ऐकत नाही आणि तो तुमचं मुळीच ऐकत नाही म्हणूनच तुमचं भलं होत असतं. शिवाला काय वाहतो आपण - बेल. बेल म्हणजे काय? दोन हाथ आणि एक माथा. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ह्यांच्यामधील संयुक्तिक करणारी रचना ह्यात - ‘तुला पाहिजे ते घडवून आण. शिवा तुला जे बदल घडवून आणायचेत त्याचं freedom तुला आहे. तुला जसं हवं तसं कर. मी मध्ये पडणार नाही आणि मी मध्ये आलो तर मला बाजूला काढ.’

महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा ह्या दिवसात परमात्मातत्वाने त्याचे maximum व्हायब्रेशन्स मोकळे केलेले असतात. त्यावेळी ते आमची capacity बघत नाही. ‘महाशिवरात्र’ हा अख्खा दिवस पवित्र आहे. ह्या दिवशी बेल व्हा. देवाला सांगा, ‘Yor are Welcome, माझ्यात तुला जे बदल घडवायचेत ते बिनधास्तपणे घडवून आण. दर महिन्यामध्ये शिवरात्र असते आणि गुरुक्षेत्रम्‌मध्ये शिवरात्रीला दर महिन्याला ‘महादुर्गेश्वराचं पूजन’ असतं हे किती जणांना माहीत आहे? दर महिन्याला दुर्गाष्टमी आणि शिवरात्र असते. इतर दिवशी आपली ताकद जास्त लागते. शिवाला आवाहन करायचं, ‘हे महादेवा, तुला जे बदल घडवून आणायचे आहेत ते बिनधास्त घडवून आणं. मी मध्ये आलो, आड आलो तर, मला बाजूला काढ. पण तुला पाहिजे तेच कर. त्यासाठी तुला full freedom आहे.

आपल्या प्रसिद्ध कथा माहित असते, तो शिकारी व्याकूळ होऊन कुत्सिकपणे शिव-शिव म्हणून हाक मारतो. हे कसं घडतं. Power of transform. हा सहजपणे लीलया बदल घडवून आणत असतो. जेव्हा आपण आपल्या मनाची भिती काढून टाकतो तेव्हा आपण बदल स्विकारतो. देव जे घडवतो ते आपोआप घडत असत. त्याने घोटाळा निर्माण होत नाही.  “हे परमशिवा, तुला पाहिजे ते घडवून आण” हे त्याला सांगायला, दर महाशिवरात्रीला आठवायचं. विसरलात तर दुसर्‍या दिवशी, तिसर्‍या दिवशी सांगायचं.

मला हल्ली बरीच पत्र येतात. त्यात लिहिलेलं असतं, “बापू, मला तुमच्या पद्धतीने लग्न करायचयं” विवाह विधी जो आहे  - तो वैदिक विवाह पद्धती आहे. लाखो पंडित ह्या पद्धतीने विवाह करून देतात. ह्या वैदिक पद्धतीत लाखो लग्न होतात. पौराणिक पद्धतीत आधी मंगलाष्टकं असतात मग सप्तपदी येते. तर वैदिक विवाह पद्धतीत आधी सप्तपदी असते मग मंगलाष्टक असतात. ह्या दोन विवाह पद्धती प्रचलित आहेत.

आपल्याकडे निधनानंतर जो विधी केला जातो त्यात मंत्राची रचना अशी केलेली आहे की ज्यामुळे तो जीवात्मा कधीच अतृप्त राहू शकत नाही, त्याला कधीच, ह्या जन्मातच नाही तर कुठल्याही जन्मी ज्याला तुम्ही मरण म्हणता, त्या मरणानंतर भूत, पिशाश्च योनी प्राप्त होणार नाही. कुठल्याही मांत्रिकाने कितीही प्रयत्न केले तरी त्या जीवात्म्याला कधीच भूत, पिशाश्च योनी प्राप्त होऊ शकत नाही. ती व्यक्ती कायम मानव योनीतच राहणार. तो जीवात्मा थेट अधिक चांगल्या गतीला पोहचतो. पण जर नातेवाईकांचा आग्रह असेल तर त्यांच्या पद्धतीने विधी करण्यास काहीही हरकत नाही. त्यांच्या पद्धतीने केल्यानंतर आपल्या पद्धतीने विधी करा. घरी रामनाम बैठक ठेवा. आधीच गेलेल्या व्यक्तीचं दु:ख असतं त्यात कटकटी करत बसू नका. आपल्याला अविरोधाच्या मार्गाने पुढे जायचं आहे. दहा दिवसानंतर कोणीही विचारायला येत नाही, आपला देवच आपल्याबरोबर असतो.

माझा कुठलाही वेगळा धर्म नाहीये. मी कुठलाही वेगळा संप्रदाय स्थापन केलेला नाहीये. मी वैदिक होतो, वैदिक आहे आणि वैदिकच असणार. कारण प्रत्येक गोष्ट वेदांच्या प्रमाणेच होत असते. वेदांमध्ये असं जे नाही असं काहीही नाहीये, आणि जे वेदांमध्ये नाही ते चुकीचचं आहे.

हा शिव जसा transaform घडवून आणतो, म्हणजे शाळेतून घरी घेऊन जातो, पृथ्वीवरून तिथे घेऊन जाणारा आणि तिथून ह्या जगात आणणारा आहे. पृथ्वीवरून आम्ही घरी जातो, मजा करतो, परत शाळेत येतो. तिथून इथे आणि इथून तिथे आणणारा हा परमशिव आहे. तिथे आणि इथे शिकवणारा हा महाविष्णू आहे. आणि ब्रह्मदेवाचं काम काय तर, इकडे तुमचं रूप, जन्म कुठे होणार, इथे कुठल्या वस्तू पुरवायच्या आणि तिथे कुठल्या वस्तू पुरवायच्या हे सगळं ब्रह्मदेव बघत असतो. तो एकच आहे.

महाशिवरात्र असा शुभ दिवस मानला आहे शंकराचार्य सांगतात की, “ह्या दिवशी उकिरडासुद्धा गंगेच्या काठाइतका पवित्र बनतो. स्मशानसुद्धा मंदिराच्या ओसरीप्रमाणे पवित्र, शुभ बनते.”

ह्या दिवसाचं महत्व आम्हाला कळलं पाहिजे. रामनवमी, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, दत्तजयन्ती, महाशिवरात्र आणि कार्तिकी एकादशी हे सात दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. ह्या दिवशी नॉन-व्हेज खायचं नाही. तसेच तीन उत्सव - गणपती (घरात असेल तर), नवरात्र (घरात असेल तर) आणि पादुका - उत्सवासाठी घरात असतील तर. नाही तर प्रमुख सेवक म्हणतील की, आमच्याकडे घरी पादुका असतात तेव्हा आम्ही नॉनव्हेज खायचचं नाही? हे दिवस अतिशय पवित्र आहेत. महाशिवरात्र अतिशय शुभ, पवित्र आहे. हा दिवस परमशिवाच्या, त्याच्या मातेच्या, गौरीच्या स्मरणात घालू तर अतिशय चांगला आहे.

दरवर्षी आपण हनुमान चलिसा १०८ वेळा एक दिवस म्हणतो. मग एक दिवस असा का असू शकत नाही. घरातल्या सर्वांच सहकार्य घ्यायचं. फक्त एक दिवस लवकर उठायचं टीव्ही. बघायचा नाही. वर्तमानपत्र वाचायचं नाही. शांतपणे देवाचं नावं घ्यायचं. कुठलाही मंत्र घ्या, रामनाम घ्या, आईचे वचन घ्या - ‘I Love My Child Always’ ‘माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते’. अख्खं स्तोत्र घ्यायची गरज नाहीए. ‘ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथ नम:’ म्हणा. दिवसभर ते म्हणत राहायचं, वर्षातून एक दिवस तरी असा हवा. आपल्या capacity नुसार दिवसभर देवाचं नावं घ्यायचं. करून बघा, बाळानों ! शुभ दिवस शोधत बसू नका. वर्षातून एक दिवस घ्यायला काहीच कठीण नाही. मनापासून करून बघा. वाचन करू नका. मनात किंवा तोंडाने म्हणा. मग त्याचं connection कसं घडणार हे तुम्हाला नंतर कळेल. मी तुमच्याकडून promise मागत नाहीए पण एकदा करा.

आपण हेमाडपतांची रामनामाची गोष्ट वाचतो. देव आपल्याला सहाय्य करतोच. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।’ हे वाक्य जरी तुम्ही म्हटले तरी तो अख्खा विठ्ठल दिसू लागेल. साधं वाक्य म्हटलं तरी त्या वाक्यात अख्खं जीवन बदलण्याचं सामर्थ्य आहे. कारण व्यासांचे आश्वासन आहे - “जो कोणी, स्त्री किंवा पुरुष दिवसातून सोळा तास नामस्मरण करतो. तो दिवस त्याच्यासाठी महाशिवरात्र असतो. वर्षातून दोन महाशिवरात्र असायलाच हव्यात. त्रिपुरारी पौर्णिमा तुम्हाला फुकट दिली आहे. परिक्षेत चार प्रश्न आहेत त्यातले दोन आधी दिलेत म्हणजे ५० मार्कस् मिळालेत, एक प्रश्न त्याआधीच दिलेला आहे म्हणजे ७५ मार्कस्. म्हणजे तुम्हाला १०० पैकी ९० च्यावर मार्कस् पडले तर तुम्हाला एन्ट्री मिळणार नाही. ज्यांना ९० मार्कस् मिळतील त्यांना मी बुडवायच्या यादीत admission नाकारणार. ही सगळी धावपळ त्याच्यासाठी चाललीय. बघा, ९० मार्कस् मिळालेत की लिस्टमध्ये नाव येत, पण इथे उलटं आहे ज्यांना ९० पेक्षा जास्त मार्कस् आहेत त्यांना मी admission नाकारणार कारण मला त्यांचं नाव बुडवायच्या यादीत नकोय.

॥ हरि ॐ ॥

 

महाशिवरात्री 21/03/2013

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२१.०३.२०१३)

॥ हरि ॐ॥

महाशिवरात्रीचा दिवस, हा नंदीपक्ष
ह्यामधील शिवाची उपासना.
भारतीयांचं अतिशय जवळचं नातं
जोडलेल असतं शिवाशी, पार्वतीशी,
त्यांच्या दोन बाळांशी, नंदीशी.

शिवरात्र, देवीच्या बाबतीतसुद्धा
नवरात्री व शिवाच्या बाबतीत
शिवरात्री. रात्रीच का? उपवास
तर आपण सकाळी करतो.

रात्र आणि अंधार ह्याच्या मधला
फरक ओळखायला शिका.
रात्र म्हणजे अंधार नव्हे, आणि
अंधार म्हणजे रात्र नव्हे.
तुम्ही तुमच्या खोलीची खिडकी दारं
बंद केली तर अंधार झाला,
रात्र झाली का? रात्री दिवे लावलेत,
सगळीकडे उजेड आहे
पण म्हणून बाहेर रात्र नाही असं नाही
होत.

रात्र व अंधार एकरूप नाहीयेत. रात्र
झाल्यावर अंधाराची भीती
वाटते हे दोघे एक नाहीत हे कळलं तर
५० टक्के भीती निघून जाते.

रात्रीला तीन भागात विभागले आहे - 
१) मोहरात्री २) कालरात्री
३) महाकालरात्री ही तीनही
आदिमातेचीच नावं आहेत.
ब्रह्मदेवाने मातृवात्सल्यविन्दानम्‌
मध्ये स्तोत्रात वर्णनकेले आहे.

रात्र आणि देवीत्व ह्यांचा संबंध आहे.
रात्री-अरात्री ह्याचा अत्रिशी संबंध
आहे. रात्र म्हणजे शांती, थकलेल्या
जीवाला मिळणारा आराम, जोमाने
नवीन काम करण्यासाठी क्षणभर
घेतलेला हॉल्ट, नवनिर्मितीची तयारी  

दिवसभर एखाद्याला जेवायला
घातलं, पण रात्री झोपू दिलं नाही,
तर काय परिस्थिती होईल? दोन-तीन
दिवसांनी तो म्हणेल जेवायला
नको पण झोपायला द्या. एवढी ह्या
झोपेची, विश्रांतीची मनुष्याला गरज
आहे. केवळ इंधन पुरवून चालत
नाही. तुम्ही नुसतं इंधन पुरवलं आणि
गाडी सतत चालूच ठेवली तर
गाडी बिघडणार नाही का? रात्र म्हणजे
नवनिर्मितीसाठी जुनी मरगळ काढावी
लागते हे सगळं करावं लागतं ते म्हणजे रात्र.
शिवरात्र का? आपल्या शरीरात नऊ
चक्र असतात. त्यातील सात जागृतावस्थेत असतात आणि दोन सुप्तावस्थेत
असतात. हृदयाच्या जागी जे अनाहत
चक्र असते त्याचा स्वामी परमशिव
आहे. जोपर्यंत त्या परमशिवाचा
डमरू वाजतोय तोपर्यंत मनुष्य जिवंत
असतो. मनुष्याच्या देहाच्या हृदयातील
लबडब आवाज म्हणजेच शिवाच्या
डमरूचा ध्वनी.
डमरू झोप न घेता चालत असतो. हा परमशिव
लबडब ह्या ध्वनीच्या वेळेस जागा आहे. 
डमरूच्या दोन स्पंदनामधला जो
काळ आहे, जी जागा आहे ती जागा
म्हणजे चिंतनशील, ध्यानस्थ शिव आहे. तो कोणाचं ध्यानं करतोय?
ज्याच्या शरीरात ध्वनी वाजतोय
त्याचं. ह्या जागेत तो निद्रिस्त,
बेशुद्धावस्थेत नाहीये. तुम्ही जितक्यांदा
परमेश्वराचं स्मरण करता, त्याचं
गुणगाण करता त्यापेक्षा जास्त परमेश्वर
तुमचं ध्यान करतो. म्हणून मी एवढं
पठण केलं, एवढा जप केला हा
अहंकार सोडा.
तुम्ही त्याचं नाव घ्या अगर नका घेऊ,
तो दर मिनिटाला ७२ वेळा तुमचं ध्यान
करत असतो. तो प्रत्येकाच्या आत
आहे, त्यामुळे त्याला तुमची प्रत्येक
गोष्ट कळत असते.
ह्याची भीती बाळगायची नाही. तो प्रेमाने
ध्यान करतो, जसं एखादी आई आपल्या
बाळाचं ध्यान करते तसं
त्या रात्रीमध्ये तुमच्याकडून सगळी
माहिती घेतो, ह्या क्षणाला हे घडलं,
तर ह्याच्या पुढच्या क्षणाला काय घडेल, ह्याचं तो प्लानिंग करत असतो. तुमच्यासाठी
शिवाची रात्र आहे तुमच्या भविष्याची
योजना तो करतो म्हणून शिवरात्रीला
शिवाची उपासना करायला हवी.

जो परमात्मा आपली ७२ वेळा आठवण ठेवतो, ७२ वेळा ध्यान करतो त्याचं
वर्षातून एका महाशिवरात्रीच्या दिवशी
ध्यान करायला काय हरकत आहे?
बेलाचं पान म्हणजे दोन हस्त आणि
एक मस्तक वालुकेश्वराला वहायचं
पण हे मी आधी सांगूनसुद्धा कोणी
लक्षात घेत नाही. तुम्ही कोणाचे हात
किंवा मस्तक अर्पण करू शकत नाही
म्हणून कोणाकडूनही बेल घेऊन अर्पण
करू नका. बेल नसतील तर देवाला
दोन्ही हात आणि मस्तक तुझ्या
चरणी अर्पण करतो म्हणून सांगा.

हस्त म्हणजे कर्मेन्द्रिय म्हणजे प्रत्येक
कर्म आणि मस्तक म्हणजे ज्ञान माहीत असलेलं आणि नसलेलं मी तुझ्या
चरणी वाहतो तुला जे द्यायचं ते दे असं
सांगा. तो तुम्हाला त्यातून चांगलं तेच
देणार म्हणून आपलं
कर्म आणि आपलं ज्ञान म्हणजे अनुभव
त्याच्या चरणी अर्पण करायचं.

हे बेलाचं पान म्हणजे माझं मस्तक
आणि माझे दोन हात आहेत, म्हणजे माझा
आतापर्यंतचा अनुभव आणि कर्म मी
तुझ्या चरणी वाहतो. त्यातून तू जे
द्यायचं ते दे.

हे बेल वालुकेश्वराला वाहताना श्रीस्वतिक्षेम्‌
संवाद होणारच आहे. तुम्ही जेव्हा लिंगाभोवती
बेल वाहणार आहात तेव्हा आपोआप सर्व होणारच आहे.
 

॥ हरि ॐ॥