My Blog List

Friday, February 13, 2015

12/02/2015 बापूंचे प्रवचन मन्यू म्हणजे 'उत्साह'

हरि ॐ   दिनांक 12/02/2015 बापूंचे प्रवचन

मन्यू म्हणजे 'उत्साह'

आपण पाणी पित नाही. दिवसाला 3.5 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे तरी आपण पित नाही.. हे आपल्या बॉडीला उत्साह आणण्यासाठी प्यावे लागते..वयाच्या 30 वर्षापर्यंत बॉडी पाणी खेचत राहते..पेप्सी, बियर हे पाण्यात नाही येत, हे लक्षात ठेवा..तर हे पाणी महत्वाचे आहे..कारण पृथ्वीवर पाणी 70% आहे आणि आपल्या शरीरात ही तेवढंच पाणी असतं..
ऊदाहरणार्थ- एखाद्याचं वजन 50 किलो आहे तर त्याच्या शरीरात 35% पाणी असतं!

थंडगार पाणी प्यायल्यामुळे लवकर तहान भागते..जो पर्यंत पाण्याची कमीत कमी पातळी स्थिर आहे, तोपर्यंत तहान नाही लागत..आपल्या मेंदूत 80 ते 85% पाणी असते..पाणी पिणे आणि पाणी पाजणे हे शब्द आपण वापरतो..

मेंदू जर सतत तेच जुनं पाणी प्यायला,  तर ते कमी होतं..आणि उत्साह येत नाही..

आपण बघतो, 5 पोळ्यांबरोबर भाजी खुप कमी खातो..म्हणजे नावाला 'शास्त्र पुर्ती' साठी खातात..हे चुक आहे..त्यात पाले भाजी म्हटली, कि डोक्यात तिडीक जाते..पण त्यातच जास्त महत्व आहे..मासे आणि चिकन खाल्ल्याने जास्त ताकद येते..भाज्या आपण नीट न खाल्ल्याने आपल्या मेंदूला थोडे सुध्दा व्हिटामिन्स नाही मिळत..

ती आपोआप तयार नाही होत..ते आपल्याला शरीरात घेतले पाहीजेत..फळं खाल्ली पाहिजे..

सुंदर काण्ड मधे लिहिले आहे..

"  सही दुख कंद मुल फल खाई..."

बटाटा खाताना 'साली आपण काढून खातो..पण त्यातच जास्त व्हिटॅमीन आहेत..भाज्या खायला पाहिजेत. पण त्या न खाल्ल्याने अंगातला चपळपणा नाहिसा होतो..आणि त्यात ही..

लाल भोपळा
लाल माठ
काकडी
बीट
शेपू
गाजर, ह्या भाज्या महत्वाच्या आहेत.

शेपूच्या भाजीत भरपुर व्हिटॅमीन्स आहेत..सर्वात जास्त ह्या भाजीत आहे..शेपूच्या भाजीला ही छान चव येऊ शकते..

पालेभाज्या आणि फळभाज्या खाणं नक्कीच  महत्वाचे आहे..जीभ ही फक्त अवयव आहे असं समजू नका..तर सर्व शरीर महत्वाचं आहे. नुसत्या चवीसाठी म्हणजेच जीभेसाठी जेवू नका..
जेवताना बोलायला खुप आवडतं..पण जेवताना काही छान झालं आहे ते आपण बोलू नाही शकत का??

शरीराला आणि मनाला चपळता आणण्यासाठी हे करणं महत्वाचं आहे..

मन्यू म्हणजे उत्साह, रसरशीतपणा..
समोर किंग कोब्रा आहे तर आपल्या मनात येईल, कि पळायला पाहिजे पण मग पळण्यासाठी आपल्यात उत्साह हवा असतो..

गल्लीच्या कोप-यावर दुकान आहे पण आपण तिकडे जाताना ही बाईक ने जातो??.चालत जायला हवं..आपल्याला 'मानव' आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे..आम्हाला बुध्दी पण देवाने दिलेली आहे..मग काय योग्य आणि काय अयोग्य हे आपल्याला कळलं पाहिजे..

आपल्याला रेसिंग करायची आहे तेंव्हा आपण पोट भरून खाल्लं तर चालेल का??.इथे काय योग्य कळायला हवं आहे..आणि इथेच माणसाला मन्यू ची गरज आहे..

जिकडे मन कमी पडते आणि आपल्याकडे त्याचा अभाव आहे तिकडेच आपल्याला मन्यू ची गरज भासते..मग आपल्याला पाहिलं पाहिजे कि 'हा मन्यू आहे कुठे??' तर सर्व निसर्गातच आहे..

नं चुकता सुर्य हा उगवतोच. तो आल्या बरोबर कोंबडा हा आरवतोच, सकाळच्या वेळी आकाशात आलेले रंग बघण्याची मज्जा वेगळीच असते..नदी वाहत असते..आपण कधी शांतपणे निसर्ग अनुभवला आहे का?? हा निसर्ग संपुर्ण मन्यू ने भरलेला आहे आणि तो आपण कसा स्विकारणार आहोत हे समजायला पाहिजे..
निसर्ग चा उत्साह घ्यायचा, तर कसा; तर शांतपणे आपल्याला हे अनुभवलं पाहिजे..
1) आपण कधी सुर्योदय पाहिला आहे का??. त्या
    आधीची वेळ अश्विनीकुमारांची असते.. आणि
    त्यांच्या, सकाळी येणा-या किरणांत उत्साह
    भरलेला असतो..पण तो आपल्याला कधी
    मिळवायची इच्छा नसते.
    ब्लॉकचा दरवाजा एवढा बंद आहे कि त्यातुन
    काहीच दिसणार नाही..

ज्याअर्थी देवाने तीन ऋतू केलेत त्याचा काही तरी अर्थ असेल नं..पण आपल्याला जरा घाम आला कि ac लागतो..असं का? आपण श्वास कसा नाकात घेतो तो आतड्यांमधे (Lungs) कसा गेला पाहिजे, तर आपल्या बॉडी (शरीरा) एवढा आत गेला पाहिजे..पण एसी असल्यावर आपल्या आतड्या dry (कोरड्या) होणार आहेत..आपल्याला 'higher standard' (उच्च दर्जा) हवं असतं..
ह्या ऋतू ची शरीराला सवय झालीच पाहिजे..

चपलेशिवाय आपण चालत नाही..आपल्या पायाला earthing (अर्थिंग) नाही मिळत..5 झाडं लावा असं मी बोललेलो..पण ती ही 30% नी लावली, जी महत्वाची होती..जी झाडं आपल्या घरात बराच फरक घडवून आणतात..

कोंबड्या बक-या खातात..मग ते काय खातात.. तर भाज्या..आणि त्या भाज्यांना अन्न कुठून मिळतं तर ह्या निसर्गातून..

आज ब-याच माणसांमधे मन्यू का नाही तर आपण निसर्गाच्या सानिध्यात जात नाही..
हिल स्टेशन ला गेल्यावर फक्त प्लॅस्टिक्स आपल्याला दिसतात..कारण बरीच माणसं तिकडे फक्त बियर नं असंच पिण्यासाठी जातात..

पोर्णिमेच्या चंद्राकडे 5 मिनिटं बघा..शांतपणे..आपल्याला शांतता नक्कीच मिळते..पिकनिक ला गेल्यावर मज्जा करायची सोडून आपण खायची सोय होते का, ते बघत असतो..

निसर्गात फक्त झाडं, आकाश आहेच..पण त्यातही आपल्या आजुबाजूची हवा शुध्द आहे का??. प्रदुषित आहे..त्यात मग मन्यू येणार कुठून? मग लक्षात ठेवा कि आपल्याला उत्साह पाहिजे.. जेंव्हा बुध्दी आणि मन कमकुवत होते तेंव्हा मन्यू असलाच पाहिजे..

जेंव्हा मनाला लागणारा उत्साह हा कमी पडला तर तो बुध्दी कडून मनाला मिळतो, आणि मना कडून बुध्दीला..

उत्साह म्हणजे उतावीळपणा नाही..ह्यात फरक आहे..जो माणूस उत्साही आहे तो व्यवस्थित काम करतो..आपल्याला उत्साह हवा आहे..उतावीळपणा नको..जिकडे जी गती आवश्यक आहे त्या गती ने काम करणारी व्यक्ती म्हणजे उत्साही व्यक्ती..

इथे बरोबर आपल्या संपुर्ण शरीराचं संचालन करणारा महाप्राण (हनुमंत) automatic आपल्याला उत्साह पुरविण्याचं काम करतो..जरी आपण त्याची भक्ती केली नाही तरी! आणि भक्ती केली तर जास्त पुरवत असतो..

बापू आम्ही नॅशनल जियोग्राफिक वर सुर्योदय पाहू..तर चालेल का?? झ-याचा पाणी वाहण्याचा आवाज रात्री झोपताना हेडफोन लावून ऐकला तर रात्री शांत झोप लागते..मग त्यात शांतता ही मिळते आणि उत्साह पण मिळतो..

उत्साहाची साथ आपल्यावा हवी आहे, हे आज आपण शिकलो..

माहिती आहे, काम वाढत असतं..आणि मनात निराशा असते पण त्यावर ही आपल्याला मन्यू असल्यावर ते ही नीट होऊन जातं..पण त्यासाठी आपल्याला तो 'मन्यू' जवळ करणे महत्वाचे आहे ते समजायला पाहिजे..
हा मन्यू आपल्याला स्विकारायचा आहे..हा 'मन्यू' आपल्याला कोण देतं?? म्हणजे याचं दैवत कोण?? आल्हादिनी लक्ष्मी, ही मन्यू ची देवता आहे. तिच्या शिवाय उत्साह नाही, म्हणजे अलक्ष्मी.. हे तिचं स्वरूप कसं आहे तर आपल्या जीवनाला रसरशीत ठेवण्यातं काम आहे..

आजपासुन आपण श्री लक्ष्मी च्या 'गुणसंकिर्तनाला' सुरूवात करत आहोत..आणि तिचा मोठा पुत्र कोण आहे, तर हा 'मन्यू'..

ही लक्ष्मी काय देते, तर जगण्याचा उत्साह देत असते..आपण धनत्रयोदशी ला ह्या श्री लक्ष्मी चं पुजन करतो..

मन्यू म्हणजे नुसता उत्साह नाही, तर सक्षम उत्साह..आणि हा उत्साह जो मनात खोलवर नेणार आहे, त्याला खोलवर उत्साह तयार होणार आहे, हे लक्षात घ्या..

अंबज्ञ 

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे

मी अंबज्ञ आहे
आम्ही अंबज्ञ आहोत..

No comments:

Post a Comment