My Blog List

Wednesday, June 3, 2015

बापूंचे प्रवचन 28/05/2015

हरि ॐ  बापूंचे प्रवचन     दिनांक 28/05/2015

आज आत्ता जे योगिंद्रसिंह कडून श्रीसुक्तम् ऐकलं तर मला आज लहानपणीची आठवण झाली. तेंव्हा नवरात्री मधे सगळ्या स्त्रिया नऊवारी साड्या, आणि पूरूष पगड्या घालायचे!  सर्वजण हे श्रीसुक्तम् बोलायचे..

आधी दिवाळीला एवढं महत्व नव्हतं, तेवढं नवरात्रीला खुप महत्व होतं..तेंव्हा सगळी मंडळी एकत्र येऊन जे प्रेम व्यक्त करायचे, ते वेगळं होतं..तेंव्हा जात वगैरे काहीच मानलं जात नव्हतं..सर्वजण आरती attend करायचे..

मग ते दिवस परत आले पाहिजेत..आता आपण गरबा खेळायला आणि जास्त काही बघायला जातो. किंवा महालक्ष्मीच्या मंदिरात जातो..

नवरात्री म्हणजे काय हे 'उपनिषद' मधुन आपण शिकलो! कि हे नऊ दिवस किती important (महत्वाचे) आहेत, हे आपल्याला कळलं! आम्हाला श्रीसुक्तम् म्हणता येतं तर आपण म्हणू किंवा 'दुर्गे दुर्घट भारी' म्हटली, तरी काय हरकत आहे?/
प्रेमाने आपल्याला रोज म्हणता येईल नं??

'त्या आईचं स्वागत करायला शिका..त्यासाठी घरात 'घट' हवाच, असं नाही. पण आपल्याला कळलं पाहिजे..कि ह्या नऊ दिवसात आईचा वावर असतोच! आणि 'तिने सांगितलंय नं' कि 'ती येते' म्हणजे 'ती येतेच येते..आणि ती स्पर्श करतेच!!'

स्पर्श करणे, म्हणजे 'ती मनाला स्पर्श करणं' (important) महत्वाचे आहे..आणि हे, महालक्ष्मी आणि लक्ष्मीचे सुक्तम् आहे; मनाला त्याचा effect (परिणाम) होतो..अर्थ कळला नाही, तरीही आपल्या मनाला ह्या सुक्तम् चा स्पर्श होतोच!

ऊदाहरणार्थ; एका व्यक्तीला जर संस्कृत मधे शिवी सांगुन 'मोठ्या आईला मंत्र म्हणुन 'म्हण' असं सांगितलं; तर त्या व्यक्तिला त्याच्या 'भावा'नुसार फळ मिळणार..आणि आपण त्याला चुकीचं सांगितलं, म्हणुन आपल्याला त्याच्या 100 ऊलट फरक पडणार आहे..

दुस-याच्या मुलाला 100/100 मिळाले आणि आपल्या मुलाला 50/100 मिळाले तरी आपल्याच मुलावर प्रेम असतंच असतं..आणि ते आपल्या आईचं असायलाच पाहिजे..आणि हिच मानवाची साधी गोष्टं मोठ्या आईपर्यंत नेली पाहिजे.. मोठ्या आईला सगळेच जवळ आहेत..
मोठ्या आईशी communicate (संपर्क/संवाद) करताना आपण नेहमी शांत राहून एक लक्षात ठेवलं पाहिजे, की "हिच्या समोर मी honest च (प्रामाणिकच) राहणार आहे..

Honest (प्रामाणिक) राहणं म्हणजे...
     1)  कान पकडणे नाही
     2)  आपल्या चुकांचा पाढा वाचणे तर नाहीच

मग असं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या साठी आई जे करते, ते चांगलंच करते, हा विश्वास हवा..

आपल्या आईवर पुर्ण विश्वास ठेवा..जे घडलं  त्या दिवशी तिला सांगायचं कि "आई आज चुकलं..आणि मनात आपल्या स्वत:ला बदलायला सुरू करायचं..

तिला आणि तिच्या पुत्राला काहीच कळत नाही; असं जेंव्हा मनात येईल, तर समजायचं की 'आपल्या अध:पतना ला सुरूवात होतेय..आणि त्यानंतर मग आपलं life (जीवन) 'नियमां'मध्ये बांधलं जाईल आणि मग त्रिविक्रम आपल्याला कधीच आयुष्यामधे मदत करायला येणार नाही..

समोरची मुर्ती बोलत नसेल; मान्य आहे..पण ती समोरची 'मुर्ती आहे' हा भावच चुकीचा आहे.. "ती तिच आहे" हा आपला भाव असलाच पाहिजे..

नवरात्री मधे आम्ही आरती कधी करू? किती ही वेळा करा..जशी जमेल तशी करा! पण प्रेमाने करा..

आरतीच्या तबकात नुसतं निरांजन ठेवुन आरती करू नका..
त्यात कमीत कमी 2-4 फुलं किंवा एक तुळशीचं पान नक्की ठेवा..कारण हा संकेत त्या लोपामुद्राने आणि अगस्त्य ऋषींनी सांगितला आहे..

आपल्या धर्मामध्ये एक important (महत्वाची) गोष्ट सांगितली आहे..आपल्याकडे 'राजोपचार पुजना'च्या वेळेला काही नसेल, तर अक्षता वहा..ते ही नसेल तर एक पान वहा आणि जर ते ही नसेल, तर पाणी वहा.. आई; जे हवं ते नक्की घेईल!!

पण आपण मोठे महाग कपडे घालून बसू आणि आईला काही देणार नाही; असं चालणार नाही..

मग अश्विन महिन्यात 'दुर्गे दुर्घट भारी' आरती म्हणा.

जेंव्हा आई बाळाला जन्म देते तेंव्हा आई बाळाचं स्वागत करते कि बाळ आईचं स्वागत करते??

बाळ बाहेर येताना आईला ज्या वेदना होतात तेंव्हा मग त्याचा प्रतिसाद म्हणुन ते बाळ; रडून आईचं स्वागत करतं!

ही, सुवर्णाचे आणि चांदीचे अलंकार धारण करते..

मग सगळ्या जगाची सम्राज्ञी आहे, तर ती चांदीचे अलंकार का धारण करते? फक्त सोन्याचे केले पाहिजेत नं??

सुवर्ण आणि रौप्य ह्यातुन आपल्याला, लोपामुद्रा काय सांगते? तर आईला सोनं आणि चांदी मधे काहीच फरक नाही..तिला सुवर्णा बरोबर रौप्य ही प्रिय आहे..म्हणजे श्रीमंता बरोबर गरीब ही आईला प्रिय आहे..रूपवान ही प्रिय आणि कुरूप ही तेवढाच प्रिय आहे..

आयुर्वेदामधे, "सुवर्णात" सगळ्या चांगल्या गोष्टी देण्याचं सामर्थ्य आहे..

आधीच्या काळात कोणी बरं नसेल, की त्या व्यक्तिला "हेम गर्भाची मात्रा" द्यायचे..ती दिल्या शिवाय कोणाला ही 'मृत' म्हटले जायचे नाही..

हे सुवर्ण, मनुष्याच्या देहातील पेशींशी जोडलेलं आहे.. मनुष्याच्या शरीरात; जे जे चांगलं घडुन आणायला हवं ते सर्व सुवर्ण करू शकतं..आणि काही ठिकाणी तो effect (परिणाम) पोहोचायला कमी पडत असेल, तर रौप्य काम करतं!

मग आई ने हे का परिधान केलं??

"त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं"

सुवर्ण - त्रातारं चं काम करते..

आणि रौप्य - अवितारं इन्द्रं चं काम करते..

ह्यातुन आई काय दाखवते, तर हे माझे अलंकार आहेत..पण लोपामुद्रा काय सांगतेय, तर तिला काही ही न करता सुवर्ण आणि चांदीचा effect देता येतो..

तुमचं गाणं सोन्याचं, म्हणजेच मधुर नसेल तरी आपल्या गुह्यसुक्तम् बरोबर आपला आवाज मिसळता यायला पाहिजे..कारण आईला फक्त भाव माहित आहे..

हे गुह्यसुक्तम् ऐकताना हळु-हळू नक्कीच गा! आणि तिला भाव कसा हवाय? सोन्याशी निगडीत नाही; तर जसा असेल तसा तिच्या चरणी तिला अर्पण करायचा आहे..

हरिणी - सर्व दु:ख, त्रास किंवा आजार दुर करणारी आहे..

तिचं मुळ नाव काय? तर 'अदिती'  कारण ती 'अक्षय' आहे..कधीच 'न खंडीत' होणारी..कारण ती अखंड आहे.. शुन्याणाम् शुन्य साक्षिणी..

कश्यपाची पत्नी अदितीमती आहे..जिची 'मति' अदिती सारखी आहे, तीच अदितीमती!!

आम्हाला खात्री पाहिजे कि, "ती काही ही करू शकते..आणि ह्या जगावर सत्ता फक्त तिची एकटीची असते..बाकी कोणाची ही नाही..आणि तिची सत्ता आपल्याला मान्य असली पाहिजे..

"निरांजन चांदीचं असलं, त्यांनाच आई जास्त पावेल..आणि आमच्याकडे साधं आहे, तर त्यांना कमी" असं नाहीच! पहिला आपला 'भाव' तपासुन बघा..आणि तो तपासायला सुरूवात जरी केली नं; तर ती आपल्याला मदत करायला येते..
आपल्याला जे जे वाईट दुर करायचं असेल आणि जे जे चांगलं करायचं असेल, त्यासाठी ती मोठी आई आपल्याला मदत करायला आणि तिचा पुत्र त्रिविक्रम आपल्या शरीरात घुसून मदत करायला तयार आहेतच..

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे

मी अंबज्ञ आहे..
आम्ही अंबज्ञ आहोत..

No comments:

Post a Comment